Jaya Kishori Networth : काय सांगता! एक कथा सांगण्यासाठी जया किशोरी घेतात इतकी फी, वाचून तुमचाही बसणार नाही विश्वास
Jaya Kishori Networth : जया किशोरी या एक उत्तम कथाकार आणि मोटिव्हेशनल स्पिकर आहेत. त्यांचे चाहते केवळ आपल्या देशातच नाही तर इतर देशातही आहेत. सोशल मीडियावरही त्यांचे लाखोंच्या घरात फॉलोअर्स आहेत.
त्या श्रीमद्भागवताचे कथा वाचन करत असतात. त्यांची हीच कथा ऐकण्यासाठी हजारो लोक हजेरी लावतात. दरम्यान अनेकांना त्या एक कथा सांगायची असेल तर किती पैसे घेतात? हे जाणून घेण्यास अनेकजण उत्सुक असतात. जाणून घेऊयात या संदर्भात सविस्तर माहिती.
दरम्यान काही मीडिया रिपोर्ट्समध्ये जया किशोरी यांच्या बुकिंग ऑफिसच्या कर्मचाऱ्याच्या हवाल्याने किशोरी किती फी घेतात हे सांगितले आहे. जया एक कथा करण्यासाठी एकूण साडेनऊ लाख रुपये घेत असतात असे सांगितले आहे.
परंतु, ते दोन भागात विभागण्यात आले आहे. अगोदर निम्मी फी भरावी लागते तसेच कथा पूर्ण झाल्यानंतर उर्वरित फी द्यावी लागते. इतकेच नाही तर किशोरी या अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्येही दिसल्या असून दानधर्म करण्यातही त्या खूप पुढे आहे. तसेच त्या आपल्या कमाईतील काही भाग अपंगांच्या मदतीसाठी खर्च करत असतात.
नुकतेच जया किशोरी यांनी यूट्यूबर सोनू शर्माशी संवाद साधला आहे. त्यात सध्या लग्न करण्याचा आपला कोणताही विचार नसून मी दोन तीन वर्षे ती लग्न करणार नसल्याचे सांगितले आहे. याबाबत किशोरी म्हणाल्या की त्यांना एक संस्कारी मुलगा आवडत असून तो आधुनिक असावा.
परंतु पारंपारिक मूल्यांची कदर त्याने करावी. तसेच त्याने कुटुंबाचाही आदर करावा. दरम्यान जया किशोरी यांचे खरे नाव जया शर्मा असे आहे. त्या लहानपणापासूनच एक कथाकार आणि प्रेरक वक्ता असून त्यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झालेला आहे.