जेईई मेनची परीक्षाही लांबवणीवर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता जेईई मेन परीक्षाही लांबणीवर टाकल्या आहेत.

याची घोषणा नॅशनल टेस्टिंग एजन्सीने केली. जेईई मेनच्या फेब्रवारी आणि मार्चमध्ये पहिले दोन सत्रातील परीक्षा पूर्ण झालेल्या आहे. एप्रिलच्या सत्रात घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. २७, २८ आणि ३० एप्रिल रोजी ही परीक्षा होणार होती.

परीक्षेसाठी सुधारित तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेच्या १५ दिवस आधी ही तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचं नॅशनल टेस्टिंग एजन्सीने म्हटलं आहे. कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांचं आरोग्य लक्षात घेऊन

परीक्षा रद्द वा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्याकडे राज्य सरकारांसह केंद्राचा कल दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच सीबीएसई बोर्डाची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली.

त्यानंतर आता जेईई मेनची परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात दररोज सुमारे ६० हजारांवर रुग्ण आढळून येत आहेत.

त्यामुळे राज्य सरकारने पहिली ते ११ वी पर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या, तर १० व १२वीच्या परीक्षा पुढे ढललल्या आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षाही लांबणीवर टाकल्या आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24