ताज्या बातम्या

Jio : जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, डेटासह मिळतील शानदार सुविधा; किंमत आहे फक्त..

Published by
Ahmednagarlive24 Office

Jio : जर तुम्ही जिओचे प्रीपेड कनेक्शन वापरत असाल तसेच तुम्हाला प्रत्येक महिन्याला रिचार्जचा खर्च कमी करायचा असल्यास हा खर्च तुम्ही कमी करू शकता. दरम्यान, जिओने तुमच्यासाठी एक खास रिचार्ज प्लॅन आणला आहे.

ज्यात तुम्ही अनलिमिटेड कॉलिंगपासून ते इंटरनेटपर्यंत सर्व काही मिळत आहे. इतकेच नाही तर या प्लॅनची किंमत खूपच किफायतशीर असून तुमचा मासिक खर्चही कमी होऊ शकतो. जिओच्या या 155 रुपयांच्या प्लॅनमध्ये शानदार फायदे आहेत. ग्राहक सुद्धा हा प्लॅन मोठ्या प्रमाणात वापरत आहेत.

कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनची ​​किंमत 155 रुपये असून तुमच्या स्मार्टफोनमध्ये हा प्लॅन रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला एकूण 28 दिवसांची वैधता दिली जात आहे.

कंपनीच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेटचाही फायदा मिळेल. यात इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला एकूण 2 GB इंटरनेट डेटा मिळत आहे. परंतु या प्लॅनमध्ये तुम्हाला दैनिक डेटा मर्यादेचा लाभ मिळत नाही.

या रिचार्जमध्ये मिळणाऱ्या 2 GB इंटरनेट डेटाची वैधता एकूण 28 दिवसांसाठी असणार आहे. डेटा संपल्यानंतर, तुम्ही हा स्मार्टफोनमधील प्लॅनवर डेटा अॅड रिचार्ज करू शकता.

या प्लॅनमध्ये तुम्हाला मेसेजिंगसाठी एकूण 300 एसएमएस सुविधा मिळत असून इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio TP, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office