Jio New Year Offer : नवीन वर्षासाठी Jio ने आणला धमाकेदार प्लॅन, मिळणार 630GB डेटासह इतर फायदे

Jio New Year Offer : देशभरात जिओच्या वापरकर्त्यांची संख्या खूप आहे. जिओने आता काही शहरांमध्ये 5G सेवा सुरु केली आहे. टप्प्याटप्प्यात ही सेवा सर्व शहरात सुरु केली जाणार आहे. नवीन वर्ष सुरु होण्यास अवघे काही दिवस उरले आहे.

कंपनीने आपल्या वापरकर्त्यांसाठी काही भन्नाट प्लॅन आणले आहेत. यामध्ये वापरकर्त्यांना 630GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळेल. तसेच इतर फायद्यांचाही लाभ मिळणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

2023 रुपयांचा प्लॅन

कंपनीने हा प्लॅन आपल्या वापरकर्त्यांसाठी न्यू इयर ऑफर प्लॅन म्हणून सादर केला आहे. 2023 रुपयांच्या या प्लॅनची वैधता 252 दिवसांची आहे. त्याशिवाय या प्लॅनमध्ये कंपनी रोज 2.5 GB डेटा मिळतो. जरी तुमचा दैनंदिन डेटा संपला तर स्पीड 64Kbps वर राहील.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनी या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा देत आहे. जर तुमची याऑफरसाठी निवड झाली, तर तुम्हाला अनलिमिटेड 5G डेटा मिळेल. यामध्ये तुम्हाला रोज 100 एसएमएस तसेच अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळेल. या प्लॅनमध्ये इतर फायदे म्हणजे JioTV, JioCinema JioSecurity, JioCloud अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळत आहे.

2999 रुपयांचा प्लॅन

जिओच्या याही प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2.5 जीबी डेटा सुविधा मिळत असून प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. म्हणजे तुम्ही एकदा रिचार्ज केल्यावर तुम्हाला वर्षभराच्या रिचार्जची कटकट संपेल.

या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतात. वाऱरील प्लॅनप्रमाणे या प्लॅनमध्येही कंपनी हाय स्पीड इंटरनेटसाठी 5G डेटा देत आहे. तर इतर फायदे म्हणजेच JioTV, JioCinema JioSecurity, JioCloud अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळत आहे.