Jio Offer : रिलायन्स जिओने आणला सर्वात स्वस्त प्लॅन, मिळणार अनलिमिटेड डेटा; किंमत आहे 200 रुपयांपेक्षाही खूपच कमी

Pragati
Updated:

Jio Offer : रिलायन्स जिओ देशातील आघाडीची खासगी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीकडे आपल्या ग्राहकांसाठी विविध किंमतीतील रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. ही कंपनी ग्राहकांना प्रीपेड, पोस्टपेड, डेटा अॅड ऑन तसेच इंटरनॅशनल रोमिंग शिवाय इतर प्लॅन ऑफर करत असते.

कमी किमतीतील रिचार्ज प्लॅनमुळे कंपनी सतत इतर खासगी तसेच सरकारी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देत असते. असाच एक टक्कर देणारा प्लॅन कंपनीने आणला आहे. ज्याची किंमत 198 रुपये इतकी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचा हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे.

कंपनी या प्लॅनमध्ये, ग्राहकांना महिन्याला अवघ्या 198 रुपयांमध्ये 10 Mbps स्पीडने अमर्यादित इंटरनेट उपलब्ध करून देत आहे. इतकेच नाही तर जिओ फायबरच्या या प्लॅनमध्ये अमर्यादित लँडलाइन कॉलिंग उपलब्ध असणार आहे. यात एक क्लिक स्पीड अपग्रेड सुविधा उपलब्ध असून जिओ फायबरच्या या प्लॅनची ​​किंमत जरी 198 रुपये इतकी असली तरीही ग्राहकांना आता स्पीड अपग्रेड आणि ओटीटीचे फायदे मिळणार आहेत.

खरतर या प्लॅनची ​​किंमत 1,490 रुपये इतकी आहे आणि यामध्ये इंस्टॉलेशनसाठी तुमच्याकडून 500 रुपये आकारले जात असून म्हणजे आता या प्लॅनसाठी 990 रुपये आणि इन्स्टॉलेशनसाठी 500 रुपये तुम्हाला मोजावे लागणार आहेत. म्हणजेच या प्लॅनची ​​मासिक किंमत 198 रुपये होईल. हे लक्षात घ्या की हा प्लॅन 5 महिन्यांसाठी असणार आहे. बॅक प्लॅन घेतल्यानंतर, ग्राहकांना 10Mbps च्या स्पीडने अमर्यादित इंटरनेट उपलब्ध होईल. म्हणजेच, तुम्ही एका महिन्यासाठी 198 रुपये भरून हा प्लॅन मिळवू शकत नाही.

Jio फायबर बॅकअप योजनेअंतर्गत 100 रुपये आणि 200 रुपये प्रति महिना असे दोन प्लॅन आहेत. या प्लॅनमध्ये 4K सेट टॉप बॉक्ससह 400 लाइव्ह टीव्ही चॅनेल, 6 OTT (Netflix, Prime Video, Disney+ Hotstar, Sony LIV, ZEE5, VOOT Selec) यांचा समावेश असणार आहे. इतकेच नाही तर, युनिव्हर्सल, लायन्सगेट प्ले, सन NXT, HoiChoi, Discovery+, JioCinema, Shemaroo, ALT Balaji, VOOT Kids, EROS Now वर प्रवेश उपलब्ध असणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe