Jio Plan: बाबो .. 200 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये जिओ देणार ग्राहकांना ‘हे’ भन्नाट सुविधा ; पाहून व्हाल तुम्ही थक्क !

Jio Plan: देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी लहान आणि मोठ्या प्रत्येक रेंजमधील प्लॅन ऑफर करते. काही ग्राहक आपल्या कमी बजेटमुळे कमी किमतीचा रिचार्ज करतात.
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
या कमी किमतीच्या रिचार्जमध्ये ग्राहकांना फ्री कॉलिंगसह जास्त डेटा मिळवण्याची अपेक्षा असते. तुम्ही देखील कमी किमतीचा रिचार्ज प्लॅन शोधात असाल तर तुमच्यासाठी आम्ही काही खास प्लॅन आणले आहे जे तुम्हाला अगदी स्वस्तात जास्त फायदे देणार आहेत. ज्यांची किंमत 200 रुपयांपेक्षा कमी आहे.
149 रुपयांच्या प्लॅन
Jio च्या 149 रुपयांमध्ये ग्राहकांना 20 दिवसांची वैधता दिली जाते. यामध्ये दररोज 1 जीबी डेटा दिला जातो, म्हणजेच तुम्हाला 20 दिवसांत 20 जीबी डेटाचा लाभ मिळेल. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस मोफत सेवाही दिली जाते.
 या स्वस्त प्लॅनमध्ये ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात. अतिरिक्त फायदा म्हणून, Jio च्या या प्लॅनमध्ये, Jio Apps JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.
209 रुपयांच्या प्लॅन
या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. जर तुमचे बजेट 200 रुपयांपेक्षा कमी असेल, तर तुम्हाला या प्लॅनसाठी 9 रुपये जास्त द्यावे लागतील, परंतु हा प्लान फायद्यांच्या बाबतीत खूप चांगला आहे. डेटाच्या स्वरूपात, ग्राहकांना दररोज 1GB डेटा दिला जातो.
म्हणजेच प्लॅनमध्ये एकूण 28GB डेटा उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सेवा उपलब्ध असेल. तसेच, ग्राहक सर्व नेटवर्कवर मोफत कॉल करू शकतात. अतिरिक्त लाभ म्हणून, यामध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले आहे. ही योजना खासकरून ज्यांना कमी किमतीत दररोज 1 GB वापरायचे आहे त्यांच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. एका रिचार्जने ते महिनाभर चालेल.