Jio Plan : रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनी सतत आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे प्लॅन घेऊन येत असते. विशेष म्हणजे इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्त प्लॅन ऑफर करते. जे ग्राहकांच्या बजेटमध्ये असतात.
त्यामुळे कंपनीच्या ग्राहकांची संख्या खूप जास्त असते.कंपनीचे असेच काही प्लॅन आहेत जे तुमच्या बजेटमध्ये येतील. हे जिओचे सर्वात जास्त विक्री करणारे रिचार्ज प्लॅन आहेत. प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा आणि मोफत OTT सबस्क्रिप्शन मिळेल. या प्लॅनच्या किमती 299 रुपयांपासून सुरू होतात.
रिलायन्स जिओचा 299 रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या या शानदार प्लॅनमध्ये इंटरनेट वापरासाठी 30 जीबी डेटा मिळेल. ही डेटा मर्यादा संपल्यानंतर, कंपनीच्या ग्राहकांना प्रति जीबी 10 रुपये खर्च करावे लागणार आहे. विशेष बाब म्हणजे कंपनी पात्र ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटा देत आहे.
या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. या प्लॅनमध्ये उपलब्ध असणाऱ्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Jio TV आणि Jio सिनेमाचा मोफत प्रवेश मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio Cloud मध्ये प्रवेश मिळेल.
रिलायन्स जिओचा 399 रुपयांचा प्लॅन
जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी 75 जीबी डेटा आणि डेटा मर्यादा ओलांडल्यानंतर, प्लॅनमध्ये तुम्हाला प्रत्येक 1 जीबी डेटासाठी 10 रुपये खर्च करावे लागेल. पात्र वापरकर्त्यांना प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा मिळेल.
प्लॅनमध्ये तीन अॅड-ऑन फॅमिली सिम उपलब्ध असणार आहेत. कंपनी फॅमिली सिमला प्रत्येक महिन्याला ५ जीबी अतिरिक्त डेटा मिळाले. यात दररोज 100 मोफत SMS सह या प्लॅनमध्ये देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. कंपनीचा हा प्लॅन Jio TV, Jio Cinema सोबत Jio Cloud वर मोफत प्रवेश देईल.
रिलायन्स जिओचा 599 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
रिलायन्स जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड डेटा आणि पात्र वापरकर्त्यांना प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये कोणतेही अॅड-ऑन फॅमिली सिम दिले जात नाही. दररोज 100 मोफत एसएमएस देणारा हा प्लान अनलिमिटेड कॉलिंग देतो. प्लॅनमध्ये उपलब्ध असणाऱ्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.
रिलायन्स जिओचा 699 रुपयांचा प्लॅन
कंपनी या प्लॅनमध्ये 100 GB डेटा आणि कंपनी पात्र वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा मिळेल. हा प्लॅन तीन अॅड-ऑन फॅमिली सिमसह येईल. कंपनी अतिरिक्त सिमसाठी प्रत्येक महिन्याला 5 जीबी अतिरिक्त डेटा मिळेल.
कंपनीच्या ग्राहकांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस मिळेल. Jio चा हा प्लॅन Jio Cloud सह Netflix (Basic), Amazon Prime Video, Jio Cinema आणि Jio TV वर मोफत प्रवेश मिळेल.