Jio Recharge Plan : 500Mbps इंटरनेट स्पीड असणारे ‘हे’ आहेत जिओचे शानदार प्लॅन्स, किंमतही आहे कमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jio Recharge Plan : देशातील सर्वात लोकप्रिय टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सतत रिचार्ज ऑफर घेऊन येत असते. ज्याचा फायदा ग्राहकांना होतो. असेच दोन रिचार्ज प्लॅन कंपनीने आणले आहेत ज्याची किंमत खूप कमी आहे.

हा प्लॅन एअरटेलला थेट टक्कर देतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला 500Mbps इंटरनेट स्पीड, टीव्ही चॅनल तसेच ओटीटी फ्री मिळतील. सर्वात महत्त्वाचे रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा दिला जात आहे. जाणून घ्या सविस्तर.

रिलायन्स जिओचा 2499 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Jio Fiber च्या या शानदार प्लॅनचे एका महिन्याचे भाडे 2499 रुपये इतके आहे. तर त्याची वार्षिक सदस्यता 29988 रुपये इतकी आहे. या प्लानचा लाभ घेण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की यावर तुम्हाला जीएसटीदेखील भरावा लागणार आहे. जर तुम्ही वार्षिक सबस्क्रिप्शन घेतले तर तुम्हाला त्यावर एकूण 30 दिवसांची म्हणजेच एक महिन्याची अतिरिक्त वैधता देखील दिली जात आहे.

या प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरण्यासाठी अनलिमिटेड डेटा देत आहे. या प्लॅनची एक खास गोष्ट म्हणजे यात तुम्हाला 500Mbps चा अपलोड आणि डाउनलोड स्पीड देण्यात येत आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये 550 टीव्ही चॅनेलही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्लॅनच्या सदस्यांना Netflix Standard, Zee5, Amazon Prime, Sony Liv, Disney Hotstar आणि इतर अनेक अॅप्सवर मोफत प्रवेश मिळणार आहे. त्याशिवाय कंपनीच्या या धमाकेदार प्लॅनमध्ये फ्री व्हॉईस कॉलिंग दिले जात आहेत.

1Gbps स्पीड

जिओ फायबरचा आणखी एक प्लॅन आहे ज्याची किंमत 3999 रुपये इतकी आहे. हा प्लॅन 1Gbps चा इंटरनेट स्पीड देतो. तसेच या प्लॅनचे 12 महिन्यांचे सबस्क्रिप्शन 47988 रुपये GST शिवाय मिळेल. या प्लॅनची जर तुम्ही वार्षिक सदस्यता घेतली तर, तुम्हाला या प्लॅनमध्ये 30 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळत आहे.

कंपनीचा हा शानदार प्लॅन 550 पेक्षा जास्त टीव्ही चॅनेलचा प्रवेश देतो. कंपनीच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला फ्री व्हॉईस कॉलिंग मिळतील. तसेच याच्या अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये तुम्हाला Amazon Prime, Netflix Premium, Disney Hotstar आणि Zee5 सारख्या अॅप्सचा मोफत प्रवेश देखील मिळत आहे.