ताज्या बातम्या

Jio Recharge Plan : अप्रतिम प्लॅन! 10 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासह अनेक फायदे

Jio Recharge Plan : भारतातील दिग्ग्ज टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचे मोठ्या प्रमाणावर ग्राहक आहेत. कंपनीचे पोस्टपेड रिचार्ज प्लॅन तसेच प्रीपेड रिचार्ज प्लॅन खूप लोकप्रिय आहेत. कंपनी सतत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते.

असाच एक पोस्टपेड रिचार्ज प्लॅन कंपनीने ऑफर केला आहे. ज्याची किंमत दिवसाला 10 रुपयांपेक्षा कमी आहे. कंपनीचा हा मासिक 296 रुपयांचा भन्नाट प्लॅन आहे. यात तुम्हाला कंपनीकडून अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासह अनेक फायदे देण्यात येत आहे.

जाणून घ्या फायदे

कंपनीच्या त्याच्या प्रीपेड वापरकर्त्यांसाठी 1 महिन्याच्या वैधतेसह डेटा तसेच कॉलिंगसाठी अनेक लोकप्रिय योजना ऑफर करत आहे. या लोकप्रिय प्लॅनपैकी कंपनीचा एक 296 रुपयांचा रिचार्ज प्लॅन असून यात कंपनी आपल्या ग्राहकांसाठी 25 GB डेटाची सुविधा देत आहे.

इतकेच नाही तर कंपनीच्या या 300 रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदाही तुम्हाला मिळेल. तसेच या रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 100 एसएमएस सुविधा मिळेल.

पहा या सेवांचे फायदे

कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी, जिओ क्लाउडची सुविधा देण्यात येत आहे. याशिवाय या प्लॅनची ​​डेटा मर्यादा संपल्यानंतरही तुम्हाला इंटरनेट वापरता येईल. समजा तुम्ही डेटा मर्यादा पूर्ण केली तर तुम्ही कमी स्पीडमध्ये म्हणजे 64Kbps च्या वेगाने नेट वापरू शकता.

या ग्राहकांना होणार फायदा

कंपनीचा हा प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी चांगला आहे ज्यांना नेहमीपेक्षा जास्त नेट लागते, त्यांना या प्लॅन फायदेशीर ठरेल. अनेकदा वापरकर्त्यासाठी डेटाची दैनिक मर्यादा संपली तर त्यांच्या महत्त्वाच्या आणि मोठ्या कामात समस्या निर्माण होते. कंपनीच्या या प्लॅनचा लाभ तुम्हाला कमी खर्चात घेता येईल.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts