Jio Recharge Plan : जिओचा सुपरहिट प्लॅन! दररोज अनलिमिटेड कॉल, डेटासह मिळेल बरंच काही, किंमतही आहे बजेटमध्ये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jio Recharge Plan : रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी आहे. कंपनीकडे पोस्टपेड तसेच प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतर टेलिकॉम कंपन्यांच्या रिचार्ज प्लॅनपेक्षा या कंपनीच्या रिचार्ज प्लॅनची किंमत खूप कमी असते.

त्यामुळं कंपनीच्या ग्राहकांची संख्या खूप जास्त आहे. आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी सतत नवनवीन रिचार्ज प्लॅन आणत असते. यात अनलिमिटेड कॉल, डेटाशिवाय इतर अनेक भन्नाट फायदे देण्यात येतात. तुम्ही तुमच्या रिचार्ज करू शकता.

कंपनीचा असाच आपला एक शानदार प्लॅन आणला आहे. यात अनलिमिटेड कॉल, डेटासह अनेक फायदे मिळतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा प्लॅन कंपनीने क्रिकेट चाहत्यांना लक्षात घेऊन लाँच केला आहे. यात दररोज 3GB डेटा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. शिवाय प्लॅनची किंमत फक्त 219 रुपये इतकी आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये या रिचार्ज प्लॅनचा लाभ घेता येईल.

रिलायन्स जिओचा 219 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन

प्लॅनच्या किमतीचा विचार करायचा झाल्यास तर रिलायन्स जिओच्या 219 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये कंपनीच्या ग्राहकांना एकूण 14 दिवसांची वैधता मिळते. कंपनीने आपल्या या शानदार प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 3GB डेटा उपलब्ध करून दिला आहे.

म्हणजेच कंपनीच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 14 दिवसांत एकूण 42GB डेटा मिळेल. तसेच, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल उपलब्ध असणार आहेत. तसेच या प्लॅनमध्ये 25 रुपयांचे व्हाउचर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे व्हाउचर वापरून, तुम्हाला 2GB अतिरिक्त डेटा मिळत आहे.

हे लक्षात घ्या की आयपीएलच्या काळात ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन कंपनीने जिओ क्रिकेट प्लॅन आणला आहे. जे वापरकर्ते क्रिकेट प्लॅनमध्ये बजेट प्लॅनच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला हा रिचार्ज प्लॅन Jio अॅपवरून खरेदी करता येईल.