Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Jio Recharge Plan : शानदार ऑफर! ‘या’ दोन प्लॅनमध्ये इंटरनेटसह मिळेल एक महिन्याची अतिरिक्त वैधता तसेच मोफत OTT प्लॅटफॉर्म वापरण्याची संधी

Jio Recharge Plan : जर तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता कंपनीने पुन्हा दोन भन्नाट रिचार्ज प्लॅन आणले आहेत. देशातील सर्वात लोकप्रिय टेलिकॉम कंपनी जिओने आपल्या ग्राहकांसाठी दोन फायबर प्लॅन आणले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या दोन प्लॅनमध्ये तुम्हाला सगळ्यात वेगवान इंटरनेट स्पीड मिळेल. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये तुम्हाला 30 दिवसांची अतिरिक्त वैधता आणि मोफत OTT प्लॅटफॉर्म वापरण्याची संधी मिळत आहे. काय आहे हा प्लॅन जाणून घ्या.

कंपनीचा 3999 रुपयांचा प्लॅन

जिओच्या या फायबर प्लॅनमध्ये तुम्हाला 1Gbps चा अपलोड तसेच डाउनलोड स्पीड मिळत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी अनलिमिटेड डेटा देण्यात येत आहे. तसेच तुम्हाला या प्लॅनच्या वार्षिक सबस्क्रिप्शनवर 30 दिवसांची अतिरिक्त वैधता सुद्धा देण्यात येत आहे.

कंपनीच्या या प्लॅनमध्ये 550 पेक्षा जास्त टीव्ही चॅनेल मोफत कॉलिंग आणि अॅक्सेस मिळेल. इतकेच नाही तर या प्लॅनच्या सदस्यांना Netflix Premium, Prime Video, Disney+ Hotstar, Sony Liv, Zee5 आणि Voot Select सारख्या अॅप्समध्ये मोफत प्रवेश मिळेल.

कंपनीचा 8499 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी 6600GB डेटा मिळत आहे. कंपनी या प्लॅनमध्ये 1Gbps इंटरनेट स्पीड देत असून जर तुम्ही 12 महिन्यांसाठी प्लॅनचे सदस्यत्व घेतले तर, तुम्हाला 30 दिवसांची अतिरिक्त वैधता मोफत मिळू शकते.

या प्लॅनमध्ये, तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगसह 550 पेक्षा जास्त टीव्ही चॅनेलवर विनामूल्य प्रवेश मिळत आहे. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये तुम्हाला Netflix, Prime Video आणि Disney + Hotstar यांसारखे एकूण 15 OTT अॅप्सचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत मिळत आहे.