JioFiber Cheapest Plan : रिलायन्स जिओने आपले Jio AirFiber लाँच केले आहे. कंपनीची ही एक नवीन इंटरनेट सेवा असून ती 30Mbps ते 1Gbps पर्यंत स्पीड देते.हे डिव्हाइस पूर्णपणे वायरलेस असल्याने तुम्ही ते घरात कुठेही वापरू शकता.
परंतु त्याच्या सेटअपसाठी Jio अॅप आवश्यक असणार आहे. या अॅपमध्ये वापरकर्त्यांना जिओ एअर फायबर सेट करण्यासाठी विविध पर्याय मिळतात. हे उपकरण १०० स्क्वेअर फूट परिसरामध्ये हाय-स्पीड इंटरनेट देते. परंतु कंपनीने अजूनही त्याची किंमत जाहीर केली नसून रिपोर्टनुसार, त्याची किंमत जवळपास 6 हजार रुपये इतकी असेल.
यात कंपनी 1Gbps पर्यंत स्पीड, अनलिमिटेड डेटा आणि OTT सबस्क्रिप्शन उपलब्ध करून देत आहे. जर तुम्हाला जास्त डेटाची गरज असेल तर तुम्ही हा प्लॅन घेऊ शकता. कंपनीचा हा प्लॅन एअरटेलला थेट टक्कर देतो.
सर्वात स्वस्त प्लॅन
आनंदाची बाब म्हणजे JioFiber 500 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या योजना ऑफर करत असून कंपनीचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन केवळ 399 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याच्या मदतीने तुम्ही बिनधास्त हायस्पीड इंटरनेटचा लाभ घेऊ शकता. या प्लॅनमध्ये 30mbps सह फास्ट स्पीड दिला आहे.
JioFiber च्या प्लॅनची वैधता
वैधतेचा विचार केला तर JioFiber चा 399 रुपयांचा प्लॅन एकूण 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्याही व्यत्ययाशिवाय संपूर्ण महिना हायस्पीड इंटरनेटचा वापर करू शकता. परंतु जर तुम्हाला इंटरनेट कनेक्शनसह हे फायदे मिळवायचे असतील तर तुम्हाला JioFiber कनेक्शनवर स्विच करावे लागणार आहे.
मिळेल मोफत चाचणी
रिलायन्स जिओकडून आपल्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी 30 दिवसांची मोफत चाचणी देण्यात येत आहे. त्यामुळे आता तुम्हाला मोफत 30 दिवस कोणत्याही त्रासाशिवाय इंटरनेट सेवेचा लाभ घेता येईल. या दरम्यान, वापरकर्त्याला सेवा आवडत नसेल तर दुसऱ्या सेवेवर स्विच करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.