JioFiber : जिओची भन्नाट ऑफर! एकही रुपया न देता बुक करता येणार JioFiber कनेक्शन

JioFiber : जिओ (Jio) ही देशातील सर्वात आघाडीची टेलिकॉम कंपनी (Telecom Company) आहे. आपल्या ग्राहकांसाठी (Jio customers) ही कंपनी सतत नवनवीन प्लॅन (Jio plan) सादर करत असते.

अशातच जिओने एक भन्नाट ऑफर (Jio offer) आणली आहे. या ऑफरमुळे तुम्हाला एकही रुपया न भरता JioFiber कनेक्शन (JioFiber connection) बुक करता येणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

JioFiber पोस्टपेड प्लॅन्स

JioFiber पोस्टपेड प्लॅन्स (JioFiber Postpaid Plans) 499 रुपये प्रति महिना पासून सुरू होतील आणि शून्य बुकिंग खर्चासह येतील. ग्राहकांना 3, 6 किंवा 12 महिन्यांसाठी पोस्टपेड योजना निवडावी लागेल.

यामुळे त्यांना इन्स्टॉलेशनसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत आणि राउटरसाठी शून्य अनामत शुल्क देखील भरावे लागणार आहे. JioFiber पोस्टपेड प्लॅन्सची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते OTT (ओव्हर-द-टॉप) फायद्यांसह येतात.

मोफत सेट-अप बॉक्स

जे ग्राहक JioFiber पोस्टपेड प्लॅनसह OTT फायद्यांसाठी दरमहा अतिरिक्त 100 रुपये किंवा 200 रुपये भरत आहेत ते कंपनीकडून Jio सेट-टॉप बॉक्स (STB) मोफत मिळवण्यास पात्र आहेत. तुम्ही JioFiber पोस्टपेड कनेक्शनसह 30 Mbps स्पीड ते 1 Gbps पर्यंतच्या योजना मिळवू शकता.

JioFiber दिवाळी ऑफर

सध्या, JioFiber सणासुदीच्या हंगामासाठी (JioFiber Diwali Offer) प्रमोशनल ऑफर देखील चालवत आहे. जे ग्राहक 599 रुपये प्रति महिना किंवा 899 रुपये प्रति महिना प्लॅन 6 महिन्यांसाठी घेतात त्यांना कंपनीकडून 15 दिवसांच्या अतिरिक्त सेवेसह 100% मूल्य परत मिळेल. प्लॅनचे 100% मूल्य ग्राहकांना Ajio, Reliance Digital, Netmeds आणि Ixigo च्या कूपनसह परत दिले जाते.

ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे आणि 28 ऑक्टोबर 2022 पर्यंत वैध असेल. JioFiber वर कनेक्शन बुक करण्यासाठी, तुम्ही कंपनीच्या कस्टमर केअरला कॉल करू शकता, जवळच्या रिटेल स्टोअरला भेट देऊ शकता किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन विनंती करू शकता.