रेल्वे खात्यात नोकरीची संधी,परीक्षेची अट नाही !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :-  रेल्वे खात्यात नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. नॉर्दर्न रेल्वेमध्ये काही पदांसाठी उमेदवार भरले जाणार असून त्यासाठी लेखी परीक्षेची अट नसणार आहे.

केवळ मुलाखतीद्वारे या पदावरील उमेदवार भरले जाणार असून 27 आणि 28 जुलैला वॉक-इन इंटरव्ह्यू द्वारे ही पदं भरली जाणार असल्याची माहिती नॉर्दन रेल्वेनं काढलेल्या प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे.

दरम्यान या पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार दरमहा 67700 रुपयांपासून 208700 रुपये दरमहा या दरम्यान वेतन मिळणार आहे. याशिवाय त्याला जोडून मिळणारे इतर भत्ते वेगळे असतील.

इच्छुकांनी आपले अर्ज https://nr.indianrailways.gov.in/nr/recruitment/1626097034854_SR_Ad-NP_Website-July-2021-converted.pdf या लिंकवर भरावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.

27 तारखेपासून विविध पदांसाठीच्या मुलाखतींना सुरुवात होणार असून यामध्ये ऍनास्थेशियासाठी 1 जागा, ईएनटी साठी 1जागा, जनरल मेडिसीनसाठी 12 जागा, जनरल सर्जरीसाठी 6 जागा, मायक्रोबायोलॉजीसाठी 1 जागा, स्त्रीरोग तज्ज्ञांची 1 जागा अशी पदं आहेत.

कॅन्सर विज्ञानसाठी 1 जागा, अस्थि रोग तज्ज्ञांची 2 पदं, डोळे विज्ञानाचं 1 पद, पेडियाट्रिक्समध्ये 1 पद आणि रेडियोलॉजीसाठी 2 पदांची भरती होणार आहे. या पदांसाठीच्या मुलाखती 28 जुलै रोजी घेतल्या जाणार आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24