अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- वादग्रस्त वक्तव्य करत नेहमी देशातील वातावरण दूषित करून प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व परिवारा विषयी वादग्रस्त वक्तव्य क्रूर आतंकवादी संघटना तालीबानशी तुलना केल्याबद्दल त्यांच्या विरुद्ध देशभरात विविध शहरात आंदोलने सुरु आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपा ओबीसी मोर्चा राहाता तालुक्याच्या वतीने जावेद अख्तर यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेला “जोडेमारो आंदोलन” करण्यात आले.

व त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करून अश्या देशविघातक प्रवृत्तीला आळा घालत जेल मध्ये बंद करावे ही मागणी आज शिर्डीच्या उपविभागीय प्रांतधिकारी यांना भाजपा ओबीसी मोर्चा राहाता तालुक्याच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

राष्ट्रीय स्वयंसवेक संघ व परिवाराला सातत्याने बदनाम करून आपली पोळी भाजण्याचा कुटील डाव जावेद अख्तर यांच्याकडून होत असतो. त्यांनी केलेल्या वक्ताव्याचा आम्ही निषेध करतो.

देशावर आलेले संकट संपत नाही तोपर्यंत संघ स्वयंसेवक आपले पाय रोवून उभे असतात. जगातील सर्वात मोठ्या सेवाभावी, देशभक्त अशा या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,

विश्व हिंदू परिषद व बजरंगदल या संघटनांची तुलना मानवतेला कलंक असलेल्या तालीबान या आतंकवादी संघटनेबरोबर करणाऱ्या जावेद अख्तर यांच्या अतिशय निंदनीय या वक्तव्या निषेध भाजप ओबीसी मोर्चा राहाता तालुक्याच्या वतीने जावेद अख्तर यांच्या प्रतिमेले जोडे मारून त्यांच्या विरोधात घोषणा देऊन करण्यात आला.