अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-राहुरी शहरातील पत्रकार रोहिदास दातीर यांचे आज दिनांक ५ एप्रिल दुपारी १२ वाजे दरम्यान मल्हारवाडी रोड येथून अपहरण करण्यात आले असून या बाबत त्याच्या पत्नी सविता रोहिदास दातीर यांनी राहुरी पोलीस स्टेशन ला अज्ञात लोकांविरोधात फिर्याद दिली आहे
या वेळी बोलताना पत्रकार रोहिदास दातीर यांच्या पत्नी यांनी म्हंटले की,म माझे पतिच्या मित्राचा मला फोन आला व त्याने सांगितले कि एका स्कॉर्पिओ गाडीतून तुमचे पती रोहिदास दातीर यांचे अपहरण करून नेले आहे .
याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भर दिवसा राज्यमंत्र्यांच्या गावात जर पत्रकार सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांचे काय या वेळी असा प्रश्न नागरिक करत आहे
त्या मुळे लवकरात लवकर पत्रकार रोहिदास दातीर यांचा शोध घ्यावा अशी मागणी पत्रकारातून होत आहे. सविता दातीर यांनी ज्या व्यक्तीवर संशय व्यक्त केला ती एका राजकीय नेत्याच्या जवळची असल्याने अनेक चर्चेला रंगत आली आहे.