अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- ग्रामीण प्रतिकृल परिस्थितीला तोंड देत नेतृत्व घडत असते. आता आपण ग्रामीण भागाकडेच लक्ष दिले पाहिजे. हातोळणमध्ये आपल्या पैकी एक तरुण मोठा झाला की त्याचा गुणगौरव करण्यासाठी युवक पुढे आले हे गावच्या विकासाचे द्योतक आहे, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी केले.
हातोळण (ता. आष्टी, जि. बीड) येथील पत्रकार सूर्यकांत वरकड यांना मराठी विषयात पीएच.डी मिळाल्याबद्दल ग्रामस्थांतर्फे त्यांचा नागरिक सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र सुपेकर, जिल्हा परिषद सदस्य उद्धवबापू दरेकर होते. अध्यक्षस्थानी पोलीस पाटील दत्तात्रेय मिसाळ होते.
तर, सरपंच राजेंद्र खुरांगे, माजी सरपंच सदाशिव मिसाळ, माजी सरपंच प्रवीण लाळगे, माजी सरपंच अमोल मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य नितीन मिसाळ, उत्तमराव मुटकुळे, दत्तात्रेय गांगर्डे, दिलीप गांगर्डे, बाळासाहेब मिसाळ, महादेव मिसाळ, प्रभाकर मिसाळ, बलभिम काळोखे, शहाराम मिसाळ, भाऊसाहेब काळोखे, अंबादास कोरडे, गंगाधर जाधव, सुखदेव कोरडे, ग्रामसेवक संदीप मिसाळ,
प्राथमिक शिक्षक नीलेश जाधव, सुधीर भालेकर, डॉ. मनोहर मिसाळ, मदन जाधव आदींसह ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुपेकर म्हणाले, की पत्रकार सूर्यकांत वरकड यांनी ग्रामीण राहून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पीएच. डी.पर्यंत शिक्षण घेतले. ही खूप मोठी कौतुकीच बाब आहे.
पीएच. डी. मिळविणं इतक सोप नसते अथक परिश्रमानंतर पीच. डी. मिळते. आता काळातील तरुण पिढी काय करते हे आपणा सर्वांना माहीत आहे. तुमचं वागणं आणि तुमचं बोलणं यात एक वाक्यता असली पाहिजे.
या गावात आल्यानंतर समजले की तालुक्याच्या ठिकाणाहून इतक्या दूर असून, या गावातील तरुणांची विकासकामांसाठी तळमळ आहे. जि. प. सदस्य उद्धव दरेकर म्हणाले, आमच्या भागातील गावे अडळवणी असले तरी या गावांतील माणसे सरळमार्गी आहेत. गेल्या 25 वर्षे या गावातील लोकांनी भरपूर प्रेम दिले.
सूर्यकांत वरकड यांना संत साहित्यात पीएच. डी. प्राप्त केली. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. या भागातील तरुणांनी विविध क्षेत्रात झेप घ्यावी, त्यांना आमचे नक्कीच पाठबळ राहील. यावेळी प्रभाकर मिसाळ, सत्कारमूर्ती पत्रकार सूर्यकांत वरकड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उत्तम मुटकुळे यांनी केले. सूत्रसंचलन नितीन मिसाळ यांनी केले.