Big News : फक्त काही दिवस अन् कायमचेच बंद होईल तुमचे खाते, जाणून घ्या नवीन नियम

Big News : आता बँकेच्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. जर तुमचे पंजाब नॅशनल बँकेत खाते असेल तर तुम्ही ही बातमी शेवटपर्यंत वाचा नाहीतर तुमचेही बँक खाते बंद होईल.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जर तुम्ही अजूनही KYC अपडेट केले नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. कारण या बँकेच्या ग्राहकांसाठी आता KYC अपडेट करणे बंधनकारक आहे.याबाबत पीएनबीने एक ट्विट केले आहे.

त्या ट्विटनुसार, ‘आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व ग्राहकांना केवायसी अपडेट करणे गरजेचे आहे. जर तुमचे खाते 30.09.2022 पर्यंत KYC अपडेटसाठी देय झाले असेल.’

Advertisement

तर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर आधीच पाठवलेल्या सूचना/एसएमएसच्या संदर्भात तुमचे KYC अपडेट करण्यासाठी तुमच्या मूळ शाखेशी संपर्क करा अशी विनंती करण्यात येते. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर तुमचे खाते बंद होऊ शकते.

‘RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार KYC अपडेट करणे गरजेचे आहे. परंतु, वेळीच सावध व्हा कारण अपडेटसाठी बँक ग्राहकांची कोणतीही वैयक्तिक माहिती विचारत नाही’, असे ट्विट PNB ने केले आहे.

बँकांना दिला हा आदेश

आरबीआयच्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, ‘ग्राहकांच्या KYC अंतर्गत, मध्यवर्ती बँकेने ठेवीदारांच्या ओळखीशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या बँकांना आर्थिक फसवणूक नियंत्रित करण्यात मदत करण्यासाठी यंत्रणा बसवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अधिक प्रक्रिया स्थापित करा, मनी लाँडरिंग आणि संशयास्पद क्रियाकलाप ओळखा. त्याचबरोबर मोठ्या मूल्याच्या रोख व्यवहारांचे निरीक्षण करा.

Advertisement