अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- दिल्ली हायकोर्टने आज ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरुन चांगलाच संताप व्यक्त केला आहे. हायकोर्टानं म्हटलं आहे की, ही कोविडची लाट नाही तर सुनामी आहे.
ऑक्सिजन पुरवठ्याला जर केंद्र, राज्य तथा स्थानिक प्रशासनातला कुणी अधिकारी अडथळा आणत असेल तर त्यांना आम्ही फासावर लटकवू, असं हायकोर्टानं म्हटलंय. महाराजा अग्रसेन हॉस्पिटलने ऑक्सिजन मिळावा यासाठी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली.
त्यामुळे न्यायमूर्तींना राग अनावर झाला. जर कोण ऑक्सिजन पुरवठ्यात खोडा घालत असेल तर त्याला फाशीची शिक्षा सुनावली जाईल, असा इशारा देत केंद्र सरकारने काय उपाययोजना केल्या याची विचारणा केली.
ऑक्सिजनचे टँकर निघाले आहेत का? असा प्रश्न हायकोर्टाने केंद्र सरकारला विचारला असता आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी टँकर निघाले असून सरकार आपल्या परीने प्रयत्न करत आहे, असे सांगितले.
यावर न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त करत ‘गेले तीन दिवस आम्ही एकच कथा ऐकत आहोत. आम्हाला माहीत आहे काय परिस्थिती आहे.’ ऑक्सिजन पुरवठा बाधित करणारे लोक कोण आहे.
आम्ही त्या लोकांना फासावर लटकवू, आम्ही कुणालाही सोडणार नाही. कोर्टानं सांगितलं की, दिल्ली सरकार तथा स्थानिक प्रशासनानं अशा अधिकाऱ्यांबाबत केंद्राला देखील माहिती द्यावी, जेणेकरुन त्यांच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकेल.