Jyotish Tips : देवी-देवतांची पूजा करून त्यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत.जर नियमांनुसार तुम्ही भगवंताची आराधना केली तर तुम्हाला अपेक्षित फळ मिळते. जर नियमांनुसार तुम्ही भगवंताची आराधना केली तर तुम्हाला अपेक्षित फळ मिळते.
शुक्रवार हा दिवससात दिवसांपैकी संपत्तीची देवीला समर्पित असतो. सुख आणि समृद्धीसाठी शुक्रवारी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होईल. त्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार उपाय करणे गरजेचे आहे.
प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यातील पैशाशी निगडित समस्या कायमच्या दूर करायच्या असतात, मात्र अनेकदा मेहनत करूनही त्यांना पाहिजे तसे फळ मिळत नाही. त्यामुळे तो सतत निराशेने भरलेला असतो. पैशाशी निगडित समस्यांवर मात करायची असेल तर तुम्ही शुक्रवारी काहीतरी केले पाहिजे.
करा हे उपाय
1. नियमानुसार जर तुम्ही शिवलिंगाची पूजा केली तर तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होतील.
2. त्यासाठी तुम्ही आठवड्यातून एक दिवस उपवास करावा. जर तुम्ही असेल केले तर देवी-देवतांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात धनाचा प्रवाह होईल.
3. तुम्हाला तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर करायची असेल तर तुम्ही लक्ष्मी आणि विष्णू या दोघांची पूजा करावी, यामुळे तुम्हाला नक्कीच धनलाभ होईल.
4. जर तुम्ही शुक्रवारी लक्ष्मीजींच्या पुत्रांच्या नावाचा जप केला तर व्यक्तीच्या जीवनातील पैशाची समस्या दूर होते.
5. इतकेच नाही तर या दिवशी केशर आणि चांदीच्या नाण्यांसोबत 5 पैसे तुमच्या मनी व्हॉल्टमध्ये ठेवा, असे केले तर तुमची पैशाची समस्या दूर होईल.