Jyotish Tips : दिवाळी अगोदर मंगळ आणि केतु यांच्या अशुभ योगाची सांगता होणार असून राहु आणि केतु राशीपरिवर्तन करतील. महत्त्वाचे म्हणजे राहु मेष राशीतून मीन राशीत आणि केतु तूळ राशीतून कन्या राशीत गोचर करणार आहेत. त्यामुळे काही राशींना त्याचा फायदा होईल.
वृषभ रास
वृषभ रास असणाऱ्या लोकांसाठी केतू-मंगळ युतीचा शेवट वरदानापेक्षा कमी नसणार आहे. या काळात तुम्हाला सौभाग्य आणि समृद्धी मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांची आर्थिक स्थिती जास्त मजबूत होईल. नोकरीमध्ये पगारवाढ आणि बढती मिळेल.
तुम्हाला कोणत्याही कायदेशीर वादात यश मिळेल. इतकेच नाही तर परदेशातही आर्थिक लाभ होईल. तुमच्या जोडीदारासोबत सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित होतील. तुम्हाला तुमच्या प्रियकर किंवा मैत्रिणीकडून चांगले गिफ्ट मिळेल.
मेष रास
ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ-केतू युतीचा शेवट मेष रास असणाऱ्या लोकांसाठी खूप फायद्याचे राहील. 30 ऑक्टोबर नंतरचा काळ वरदान ठरू शकतो. या काळात तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला चांगले यश मिळेल. नोकरीसाठी हा काळ फायदेशीर असेल. या काळात तुम्हाला व्यवसायातून भरपूर लाभ मिळेल. गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होऊ शकतो.
वृश्चिक रास
मंगळ-केतूच्या अशुभ संयोगाचा शेवट वृश्चिक रास असणाऱ्या लोकांसाठी खूप फायद्याचा मानला जातो. ज्यावेळी केतू 30 ऑक्टोबरला दुसऱ्या राशीत जाईल, त्यावेळी हा काळ तुमच्यासाठी निर्णायक ठरू शकतो. व्यवसायात आर्थिक लाभ होईल. मंगल देवाच्या कृपेने नोकरीत प्रगती होईल. वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क मिळेल. तसेच गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होऊ शकतो.
तूळ रास
ज्यावेळी 30 ऑक्टोबरला या राशीसोबत केतू-मंगळाचा संयोग संपेल त्यावेळी जीवनात सकारात्मकता दिसेल. या काळात तुम्हाला शुभ ग्रहांचे विशेष आशीर्वाद मिळेल. या काळात तुम्हाला व्यवसायातून खूप पैसे मिळतील. मेहनतीचा फायदा मिळेल, नोकरीमध्ये बढती होऊ शकते.
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनातील सगळ्या समस्या संपतील. या काळात तुम्हाला गुंतवणुकीतून आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकते. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. प्रवासाची शक्यता असून तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो.