Jyotish Tips : नवीन वर्षातील पहिले चंद्रग्रहण नुकतेच म्हणजे ५ मे रोजी पार पडले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक अद्भुत योगायोग एक दोन नव्हे तर एकूण 130 वर्षांनंतर बुद्ध पौर्णिमेला घडला आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार सांगायचे झाले तर येत्या 12 ते 14 तारखेपर्यंत चंद्र हा कुंभ राशीत शनिसोबत राहणार आहे. त्यामुळे विष योग तयार होत आहे. मात्र या विष योगाचा गंभीर परिणाम राशींवर दिसून येणार आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी. दरम्यान या राशी कोणत्या आहेत? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
कोणत्या आहे राशी पहा?
कर्क
चंद्र आणि शनीच्या संयोगामुळे निर्माण झालेल्या विष योगाचा प्रभाव हा कर्क राशीवर खोलवर पडणार आहे. चंद्र हा मनाचा कारक असल्याने या विषाचा मानसिक परिणाम दिसून येणार आहे. त्यामुळे अशावेळी कोणतेही काम लवकरात लवकर होणार नाही. सतत या राशीच्या लोकांचे काम बिघडेल. त्यांचे मन अस्वस्थ होऊ शकते. इतकेच नाही तर त्यांच्या वैवाहिक जीवनातही अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यांना मुलांकडून त्रास होईल आणि धनहानीही होईल.
कन्या
या योगाचा कन्या राशीवरही वाईट परिणाम आपल्याला दिसून येणार आहे. कन्या राशीचे लोकांनाही मानसिक त्रासातून सामोरे जावे लागणार आहे. धनहानी होऊन शत्रूंचे वर्चस्व राहू शकते. तुम्ही ज्या ठिकाणी काम कराल त्या ठिकाणी तणाव आणि भीतीची परिस्थिती असणार आहे. खर्चात वाढ होण्याची शक्यता असल्याने उधळपट्टी टाळण्याचा प्रयत्न करावा.
वृश्चिक
या योगाचाही वृश्चिक राशीवर नकारात्मक प्रभाव पडत असून अशातच या राशीवर शनीची सावली पूर्वीपासून फिरत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या समस्येत वाढ होणार आहे. व्यवहारात सावधगिरी बाळगावी कारण तुमची धनहानी होण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर आरोग्याचीही काळजी घ्यावी. मानसिकदृष्ट्या खूप उलथापालथ होऊन तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला यश मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे.