Kacha Badam : कच्चा बदाम’ ज्याने बनवल तो फेसम तर झाला पण एक रुपयाही नाही भेटला…आता गावकऱ्यांनी उचलले हे पाऊल !

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :- आजकाल ट्रेंडिंग व्हिडिओंमध्ये ‘कच्चे बदाम’ गाण्याची खूप क्रेझ असून, सोशल मीडियावर स्क्रोल करताना तुम्हाला कधी ना कधी ‘कच्च्या बदामाचे गाणे’ नक्कीच आले असेल.

बंगालमधील एका छोट्या शहरात बदाम विकणारा भुवन बद्यकर याची बदाम विकण्याची अनोखी शैली रेकॉर्ड केली आणि सोशल मीडियावर टाकली. त्यामुळे भुवन बद्यकर रातोरात प्रसिद्ध झाला.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

भुवनची बदाम विकण्याची खास शैली लोकांना आवडली आणि काही वेळातच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याच्या व्हिडिओची लोकप्रियता एवडी आहे की, त्या व्हिडिओला आतापर्यंत ५० दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि तो विडिओ लाखोंमध्ये शेअरही केला जात आहे.

भुवनला त्याच्या गावात जेव्हा दूरदूरचे लोक भेटायला येऊ लागले, तेव्हा त्याला त्याची कीर्ती कळाली. लोक आले आणि त्याच्यासोबत फोटो आणि व्हिडिओ बनवू लागले. सोशल मीडिया पासून लांब असणाऱ्या भुवनला आपण इंटरनेटवर फेमस झाल्याची कल्पनाही नव्हती.

शेंगदाणे विकून भुवन कमवायचा २०० रुपये – भुवन म्हणतो की, मी तर याला देवाचा आशीर्वाद मानतो की, त्यांनी मला यासाठी योग्य समजले. मी एका बस्तीमध्ये राहतो आणि तेथून कच्चे बदाम (शेंगदाणे) विकतो.

आयुष्य हळूहळू बदलत आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत भुवन म्हणतो की, मी ५० वर्षांचा असून, मला दोन मुलं आणि सून आहेत. तसेच मुलीचे लग्न झाले आहे.

मी व्यवसायाने शेंगदाणे (कच्चे बदाम) विकतो. कच्चे बदाम विकून मी दिवसाला २०० ते २५० रुपये कमावतो. लोकप्रियतेमुळे माझी पत्नी खूप आनंदी झाले आहे आणि घरातील सदस्यही आनंदी झाले आहेत.

भुवनला कच्च्या बदामाच्या अधिकृत व्हिडिओसाठी पैसे मिळाले नाही – भुवन रावल बदामच्या एका म्युझिक व्हिडिओमध्येही दिसला आहे. त्याचा अनुभव सांगताना भुवन म्हणतो की, मी हिरो बनलो याचा मला खूप आनंद आहे.

गावात येताना लोक म्हणू लागले की, भुवन तू फेमस झालास, मी विचारले कस रे, तर त्यांनी व्हिडिओ अपलोड केल्याचे सांगितले आहे. बांगलादेशातून अनेक लोक मला भेटायला येतात, माझ्यासोबत फोटो काढतात.

मी स्टुडिओमध्ये गाणे सुद्धा गायले, पण मला तिथे पैसे मिळाले नाहीत. माझ्याकडे ६०-४०% चा करार आहे, ज्याचे पैसे मला मिळालेले नाहीत. पैसे देणार असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र अद्याप काहीही कळू शकलेले नाही.

जे येतात ते रेकॉर्ड करून मला ५०० ते २-३ हजार देऊन निघून जातात. यूट्यूबवाले काही पैसे देऊन ये-जा करतात, तर स्टुडिओचे ऑडिओ आणि व्हिडीओ जे रेकॉर्ड झाले आहेत, त्याचे मला पैसे मिळालेले नाहीत.

पुढे भुवन सांगतो की, माझी लोकप्रियता पाहून लोक मला त्यांच्या पार्टीत बोलावतात. पंडाल असो किंवा सरस्वती पूजेचा कोणताही कार्यक्रम, ते मला गाणी म्हणायला लावतात, तिथे गाणी गाण्यासाठी ते मला पैसे देतात.

गावकऱ्यांनी बाहेरच्यांना घातली बंदी भुवनच्या जवळचे लोक सांगतात की, बाहेरच्या लोकांकडून शोषण होत असल्याचे, पाहून गावकऱ्यांनी भुवनला भेटण्यास बंदी घातली आहे.

भुवनचा वापर करून लोक निघून जातात आणि त्यांना त्यांची देणी देत ​​नाहीत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत आता गावकऱ्यांच्या संमतीशिवाय बाहेरील कोणीही भुवनला भेटू शकत नाही.