कळसूबाई, हरिश्चंद्रगड, भंडारदरा पर्यटकांसाठी बंद !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :-आदिवासी भागात करोनाचे संक्रमण टाळण्यासाठी ‘कळसुबाई हरिश्चंद्रगड -अभयारण्य’येत्या शनिवारी-रविवारी पर्यटक व ट्रेकर्स यांना पर्यटनासाठी बंद राहणार आहे.

शेंडी वन विश्रामगृह येथे कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील लोकप्रतिनिधी सरपंच, पोलिस पाटील, वन समिती यांचे अध्यक्ष सदस्य वन अधिकारी कर्मचारी व पोलिस अधिकारी कर्मचारी यांची झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंट च्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहे.

दरम्यान, डेल्टा प्लस चा शिरकाव गावपातळीवर होऊ नये, यासाठी नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांच्या आदेशान्वये सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी भंडारदरा येथील कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यामधील २६ गावांचे सरपंच,

ग्राम परिस्थितीकिय विका समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत शेंडी येथील वन विश्रामगृह येथे बैठक घेतली. यावेळी गावकऱ्यांसोबत झालेल्या चर्चेतून शनिवार, रविवारी पर्यटकांना मज्जाव करण्याच्या निर्णयावर सर्वांनी शिक्कामोर्तब केल्याचे रणदिवे यांनी सांगितले.

याप्रसंगी भंडारदरा वनक्षेत्रपाल अमोल आडे, राजूरचे वनक्षेत्रपाल दत्तात्रट पडवळे, वनपाल रवींद्र सोनार यांच्यासह पोलीस अधिकारी, पोलीस पाटील, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24