Kanda Bajarbhav : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कांदा बनला चार हजारी ; वाचा आजचे कांदा बाजार भाव

Kanda Bajarbhav : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या बाजार भावात रोजाना वाढ पाहायला मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळत आहे. मित्रांनो खरं पाहता शेतकरी बांधवांनी कांदा चाळीस साठवलेला उन्हाळी कांदा आता संपत आला आहे. शिवाय नवीन लाल कांदा देखील बाजारात अजूनही मोठ्या प्रमाणात दाखल झालेला नाही.

अशा परिस्थितीत बाजारपेठेत कांद्याचा शॉर्टज निर्माण झाला आहे. यामुळे मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने कांद्याच्या बाजारभावात (Onion Rate) वाढ होत असल्याचे जाणकार लोकांनी नमूद केले आहे. दरम्यान आज देखील कांदा बाजार भावात मोठी वाढ झाली आहे. मित्रांनो आज कांद्याच्या सरासरी बाजार भावाने 3000 रुपये प्रति क्विंटलचा पल्ला सर केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शिवाय आज कांद्याला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. यामुळे निश्चितच कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत आहेत. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मिळालेल्या बाजारभावाची विस्तृत पण थोडक्यात चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया राज्यातील आजचे कांदा बाजार भाव.

राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :- राहता एपीएमसी मध्ये आज 1964 क्विंटल कांद्याचे आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये कांद्याला 700 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव 2650 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

जुन्नर आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज जुन्नर एपीएमसी मध्ये कांद्याला सर्वोच्च बाजार भाव मिळाला आहे. या एपीएमसी मध्ये आज कांद्याचे 8144 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव देखील 3000 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकलूज एपीएमसीमध्ये आज 325 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. या एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात आज कांद्याला सहाशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला अडीच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजारभाव मिळाला आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- पुणे एपीएमसी मध्ये आज 14,274 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. या एपीएमसी मध्ये आज कांद्याला एक हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 3000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे तसेच सर्वसाधारण बाजार भाव दोन हजार रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 503 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला सातशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून अडीच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1600 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.