एकेकाळी कपिल शर्मा देणार होता समुद्रात जीव ! २४ तास दारू पिवून करायचा हे कृत्य…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 08 नोव्हेंबर 2021 :- कपिल शर्माचे लाखो चाहते आहेत, त्याच्या कॉमेडीचे चाहते देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत. पण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वाईट काळ येतो, त्यामुळे कपिल शर्माच्या आयुष्यातही ती वाईट वेळ आली आणि तो अशा संकटात अडकला की त्याच्या मनात आत्महत्येचे विचारही येऊ लागले. कपिल शर्माने काही वाईट सवयींमुळे अनेक समस्यांचा सामना कसा करावा लागला याचा खुलासा केला आहे.

आत्महत्येचे विचार येत होते :- कपिल शर्मा हा एक असा स्टार आहे ज्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर खूप काही मिळवले.परंतु त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आणि याच काळात तो आत्महत्येचा विचार करू लागला, त्यानंतर शाहरुख खान त्याच्या आयुष्यातला मसिहा बनला. तो आला आणि त्यांनी कपिलला या संकटातून बाहेर काढले. कपिल शर्माच्या वाईट काळात शाहरुख खान त्याच्यासाठी मसिहा बनून आला होता. त्यानीच हा खुलासा केला.

शाहरुखने मदत केली :- कॉमेडियन कपिल शर्माने एका मुलाखतीदरम्यान अल्कोहोल सेवन आणि चिंता याविषयी सांगितले होते. या दोन्ही अडचणींतून बाहेर पडण्यासाठी शाहरुख खानने मदत केल्याचे त्यानी सांगितले. कपिलने सांगितले होते की, त्याने दारू पिण्यास सुरुवात केली होती, त्यानंतर तो त्याच्या करिअरमध्ये सतत खाली पडत होता. मात्र शाहरुख खानच्या मदतीने तो पुन्हा रुळावर आला.

समुद्रात उडी मारावी असे वाटले होते :- ‘फिरंगी’ चित्रपटादरम्यान कपिलने सांगितले होते की, शाहरुख खानने त्याला मानसिक आणि शारीरिक मार्गदर्शन केले होते आणि मद्यसेवन आणि त्याच्या नर्व्हसनेसमधून बाहेर काढले होते. त्याने सांगितले की, एकेकाळी तो इतका डिप्रेशनमध्ये गेला होता की त्याला स्टेजवर परफॉर्म करायलाही भीती वाटत होती आणि तो आपल्या कुत्र्यासोबत ऑफिसमध्ये कोंडून राहायचा.

त्याच्या शोमध्ये लोक येणे बंद झाले आणि तो लोकांच्या रडारवरून पडू लागला. मात्र, त्याचा मूड थोडा बदलण्यासाठी त्याच्या एका मित्राने त्याला त्याच्या सी-फेसिंग अपार्टमेंटमध्ये काही दिवस राहण्याचा सल्ला दिला. अपार्टमेंटमध्ये पोहोचल्यावर समोरचा अथांग समुद्र पाहून त्यात उडी मारावी असे मनात आले.

नकारात्मक प्रसिद्धी हे कारण होते :- कपिलने सांगितले की, त्याच्या डिप्रेशनमध्ये जाण्याचे कारण म्हणजे त्याची नकारात्मक पब्लिसिटी होती. त्या वेळी त्याला असे वाटले की जणू संपूर्ण जग त्याच्यावर गोळीबार करत आहे. तो म्हणाला की, ट्विटरवरील लोकांच्या ट्विटमुळे त्याचा त्रास वाढायचा. कपिल म्हणाला की त्या काळात माझ्याकडे नकारात्मक प्रसिद्धी टाळण्यासाठी कोणताही पीआर नव्हता, मी ते बदलू शकत नाही, पण मी खऱ्या मनाचा माणूस आहे हेही खरे आहे.

Ahmednagarlive24 Office