Kapus Bajarbhav : शेतकऱ्यांनो धीर धरा ! सध्या कापसाची विक्री करू नका ; ‘या’ महिन्यात कापसाला मिळणार उच्चांकी बाजार भाव, तज्ञांची माहिती

Kapus Bajarbhav : सध्या कापसाला अतिशय कवडीमोल दर (Cotton Rate) मिळत असल्याचे चित्र आहे. कापूस बाजार भाव कमालीचे दबावात आहेत. यामुळे राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी बांधव अडचणीत सापडले आहेत.

मात्र असे असले तरी हंगाम सुरू झाला आणि कापूस बाजार भाव पडले हे काही पहिल्याच वर्षी घडले आहे असे नाही. या आधी देखील अनेकदा शेतकरी बांधवांनी कापूस वेचणी केली, कापूस विक्रीला आणला की कापसाचे बाजार भाव पडतातच. केवळ गेल्यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापूस बाजार भाव तेजीत होते. तज्ञ लोकांच्या मते त्याला कारणे देखील तशीच होती.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

गेल्या वर्षी कापूस लागवडीखालील क्षेत्रात घट झाली असल्याने तसेच प्रमुख कापूस उत्पादक राष्ट्रात हवामान बदलाचा परिणाम झाला असल्याने कापूस उत्पादनात मोठी घट झाली होती शिवाय कापसाला कधी नव्हे ती विक्रमी मागणी गेल्या वर्षी नमूद करण्यात आली. अशा परिस्थितीत कापसाच्या बाजारभावात गेल्यावर्षी वाढ झाली होती. मात्र, अनेकदा शेतकरी बांधवांच्या हातात कापूस आल्यानंतर कापसाचे दर पाडले जातात.

खरं पाहता उद्योगाकडून सुरुवातीच्या टप्प्यात शेतकऱ्यांकडून कमी भावात कापूस खरेदी केला जातो आणि मग नंतर बाजारात त्यांनी साठवलेला कापूस विक्रीसाठी आणून तेजी-मंदी केली जाते. त्याचा फायदा मात्र शेतकऱ्यांना होत नाही. खरं पाहता जिनिंग आणि प्रेसिंग उद्योगाकडून कापसाला उद्योगाकडून मागणी होत नसल्याचे सांगत आहे. तर उद्योग कापडाला मागणी नसल्याचे कारण पुढे करत आहे.

मात्र या सगळ्यांमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. खरं पाहता गेल्या काही दिवसांपूर्वी कापसाला सात हजार रुपये प्रतिक्विंटल ते साडेनऊ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत होता. मात्र आता सहा हजार रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजारभाव मिळू लागला आहे. म्हणजेच 1000 रुपयांची बाजारभावात घसरन झाली आहे.

अशा परिस्थितीत या दरात शेतकरी बांधवांनी कापसाची विक्री करू नये असे आवाहन कापूस तज्ञांकडून केले जात आहे. कापूस तज्ञांच्या मते शेतकरी बांधवांनी अजून दोन महिने कापसाची विक्री न केल्यास त्यांना याचा फायदा होणार असून कापसाच्या बाजारभावात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. जाणकार लोकांच्या मते आपल्या देशात कापसाचा वापर खूप अधिक आहे. त्यामुळे कापसाचे बाजार भाव अधिक काळ दबावत राहू शकत नाही.

यामुळे शेतकरी बांधवांनी कापसाची विक्री करताना बाजारपेठेचा आढावा घ्यावा. खरं पाहता दिवाळी सणानिमित्त आणि रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी शेतकरी बांधवांनी कापसाची मोठ्या प्रमाणात विक्री केली. मात्र आता शेतकरी बांधव आपल्या जवळचा कापूस साठवून ठेवतील असे जाणकार नमूद करत आहेत.

दरम्यान शेतकऱ्यांनी जानेवारी-फेब्रुवारीत कापसाची विक्री केल्यास 9 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव शेतकऱ्यांना मिळू शकतो. निश्चितच शेतकरी बांधवांनी बाजारपेठेचा आढावा घेत कापसाची विक्री करणे त्यांच्यासाठी फायद्याचे राहणार आहे.