अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- करुणा धनंजय मुंडे यांनी शिवशक्ती सेना या पक्षाची घोषणा अहमदनगरमध्ये केली. राज्यात सामाजिक कार्य करत असताना असे लक्षात आले की, राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे.(Karuna Dhananjay Munde)
महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पक्षात येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. हा पक्ष महाराष्ट्रातील सर्व निवडणुका लढवणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली.
करूना मुंडे यांनी आज अहमदनगर मध्ये पत्र परिषद घेतली. यावेळी भाऊसाहेब शिंदे, रवी गवळी, दादासाहेब जावळे, भारत भोसले आदी उपस्थित होते.
करूना मुंडे म्हणाल्या की, महाराष्ट्रामध्ये हजारो कोटींचे घोटाळे होतात. पक्षात येण्यापासून निवडणूक लढवणे आणि मंत्री होईपर्यंत कोट्यवधी रुपये दिल्याशिवाय पदे मिळत नाहीत.
एक-एक मंत्री दीड ते दोन हजार कोटींचे घोटाळे करतो. हा सर्व भ्रष्टाचार संपवायचा आहे. त्यासाठी माझा पक्ष काम करेल,” अशी घोषणाही मुंडे यांनी केली.
भ्रष्टाचार मंत्री करतात आणि अधिकारी, पोलीस अधिकारी बळी दिले जातात, हे मी २५ वर्ष पाहिलेले आहे. त्यामुळे आता हे संपवायचे असल्याचं त्या म्हणाल्या.