अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- करूणा शर्मा यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. बीडमधील अंबाजोगाई सत्र न्यायालयाने जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांच्या न्यायालयीन कोठडीत आता वाढ करण्यात आली आहे.
शर्मा यांचा चार दिवसांनी कोठडीतला मुक्काम वाढला आहे. त्यामुळे १८ सप्टेंबरपर्यंत करुणा शर्मा या न्यायालयीत कोठडीत असणार आहेत.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित आरोप करणाऱ्या करुणा शर्मा काल (रविवार) परळीत दाखल झाल्या होत्या.
यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्यांच्या वाहनामध्ये पिस्तूल आढळून आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. तर, समाज माध्यमातून धनंजय मुंडेंच्या विरोधातील सर्व पुरावे जाहीर करण्याचा इशारा देऊन
करुणा या परळीत दाखल झाल्या होत्या. परळीत दाखल झाल्यानंतर करूणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळल्याने, एकच खळबळ उडाली होती.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना अंबाजोगाई न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.