कार्यसम्राट आमदार: मोनिकाताई राजळे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:- आ. मोनिकाताईंचा स्वभाव अतिशय शांत, मनमिळावू असून, त्यांनी आज पर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यावर कधीही वैयक्तिक पातळीवर टीका केलेली नाही. त्यांना कृष्णा व कबीर, ही दोन मुले असून, कृष्णा उच्चशिक्षण घेत आहे.

आ. राजळे यांना तालुक्यातील राजकारणात पती स्व. आमदार राजीव राजळे, माजी आ. अप्पासाहेब राजळे (सासरे) यांचा राजकीय वारसा मिळाला आहे. त्यामुळे त्यांना तालुक्याच्या प्रथम महिला आमदार होण्याचा बहुमानही मिळाला आहे.

त्यांनी मतदारसंघात विविध विकासकामे करून दोन्ही तालुक्यांतील राजकीय क्षेत्रात मोठा दबदबा निर्माण केला असून, सर्वसामान्य जनतेने त्यांना कार्यसम्राट आमदार, पदवी बहला केली आहे. आ. मोनिकाताई राजळे यांना वाढदिवसानिमत्त शुभेच्छा!

शेवगाव-पाथर्डीच्या आमदार आमदार मोनिकाताई राजळे यांनी गेल्या सहा वर्षांत मतदारसंघातील विविध विकासकामे मार्गी लावल्याने खऱ्या अर्थाने एक कार्यकार्यसम्राट आमदार व सर्वसामान्यांच्या नेत्या म्हणून नावलौकिक मिळवला आहे. आ. राजळे यांची जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.

नुकत्याच झालेल्या तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत आ. राजळे यांनी अनेक गावांतील सत्ता आपल्या ताब्यात ठेवली आहे. आ. राजळे यांनी आमदार निधीतून अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत.

तालुक्यात कोविडच्या आजाराने अनेक नागरिक त्रस्त झाले होते. तसेच काही कोरोना बाधितही झाले होते. बाधित नागरिकांना तसेच त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना आ. राजळे यांनी धीर दिला. मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांमुळे आ. राजळे या विधानसभेला दुसऱ्यांदा भरघोस मतांनी निवडून आल्या.

दोन्ही तालुक्यातील जनतेने निवडणुकीत चांगले मताधिक्य देऊन दाखविलेला विश्वास आमदार मोनिकाताई राजळे सार्थ ठरवत आहेत. आ. राजळे यांनी मतदारसंघात विकास कामांना प्राधान्य दिले असून, गावागावांतील विविध विकासकामे मार्गी लावली आहेत.

आ. राजळे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच आग्रही असतात. गावागावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्ते डांबरीकरण, मजबुतीकरण, सभामंडप, पुनर्वसित गावांचे प्रश्न, अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तसेच तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्यांनी सोडविले आहेत.

त्यांना दोन्ही तालुक्यांतील तरुण कार्येकर्ते तसेच ज्येष्ठांचे विशेष सहकार्य मिळत आहे. त्यांना पाथर्डी -शेवगाव तालुक्यातील जनतेची तसेच प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची साथ मिळत आहे. आ. मोनिकिताई राजळे या ज़नतेच्या सुख-दु:खात नेहमी सहभागी असतात.

अहमदनगर लाईव्ह 24