अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- कोरोनाच्या संकटात नागरिकांच्या आरोग्याबरोबरच शहर विकासाचे प्रश्न सोडवण्याचे काम करत आहे. या कोरोना संकटांमध्ये केंद्राची व राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असतानाही शासनाकडून निधी उपलब्ध करून आणला आहे.
केडगाव उपनगराच्या विकासकामासाठी प्राधान्याने निधी दिला जातो. नगरसेवक मनोज कोतकर हे नेहमीच विकास कामासाठी भूमिका पार पाडत असतात.
विकास कामे करीत असताना सर्वांच्या सहकार्याची गरज आहे, भविष्यकाळात केडगाव उपनगर हे विकासकामामुळे विकसित उपनगर म्हणून ओळखले जाईल असे प्रतिपादन,आमदार संग्राम जगताप यांनी केले.
प्रभाग क्रमांक १७ मध्ये अथर्व नगर येथे नगरसेवक मनोज कोतकर यांच्या प्रयत्नातून रस्ता डांबरीकरण कामांचा शुभारंभ भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ निंबाळकर यांच्या हस्ते झाला. यावेळी नगरसेवक राहुल कांबळे, माजी नगरसेवक सुनील कोतकर, भूषण गुंड,सोनू घेमुड, प्रसाद आंधळे,
पंकज जहागीरदार,भैरू कोतकर, संभाजी पवार, माऊली जाधव, बच्चन कोतकर, अजित कोतकर, नितीन घोडके, दीपक तागडे, दिलीप दुधने, सुनील बिचकर, विजय बडवे, विठ्ठल गारुडकर, ताराचंद केवट,
सतीश सुर्यवंशी, ओंकार कोतकर, नीलेश तांबे, संदीप मराठे, समीर कुलकर्णी,मकरंद जोशी, रेखा पावसे, मनीष तांबोळी आदी उपस्थित होते.