Maa Lakshmi Tips : नवीन वर्षात घराच्या दरवाजावर ठेवा या गोष्टी, घरात येईल लक्ष्मी, पुन्हा कधीही जाणार नाही…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maa Lakshmi Tips : डिसेंबर महिन्यातील काही दिवस बाकी राहिले आहेत. तसेच नवीन वर्ष सुरु होणार आहे. नवीन वर्षात अनेकजण विविध योजना आखत असतात. जर तुम्हाला घरात सुख शांती आणि माँ लक्ष्मीचा अधिवास पाहिजे असेल तर तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील.

वास्तूमध्ये असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, नवीन वर्षात करून पाहिल्यास देवी लक्ष्मीची कृपा घरात कायमस्वरूपी राहू शकते. वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या केल्याने संपूर्ण वर्ष चांगले जाईल. यासोबतच प्रत्येक क्षेत्रात यशही मिळेल.

वास्तुशास्त्रामध्ये देवी लक्ष्मीचा कायमचा आशीर्वाद मिळविण्यासाठी नवीन वर्षाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर काही वस्तू ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या गोष्टींबद्दल जाणून घेऊया.

नवीन वर्षाच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर यापैकी काही ठेवा

घोड्याची नाळ

वास्तुशास्त्रात घोड्याच्या नाळीचे विशेष महत्त्व सांगितले आहे. असे म्हटले जाते की घोड्याची नाल हे सौभाग्याचे प्रतीक आहे. घराच्या मुख्य दरवाजावर लावल्यास नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि सुख-समृद्धी प्राप्त होते.

धार्मिक चिन्हे लावा

घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक, ओम, क्रॉस इत्यादी चिन्हे लावल्यानेही घरात सकारात्मक ऊर्जा राहते. यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीचा मार्ग खुला होतो.

गणेशाची मूर्ती

घरात सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी घराच्या मुख्य दारावर गणेशाची मूर्ती किंवा चित्र लावता येते. लावताना लक्षात ठेवा की श्रीगणेशाचा चेहरा आतील बाजूस असावा. चेहरा बाहेर असल्यास धनहानी होते.

तांब्याचा सूर्य

वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर तांब्याचा सूर्य ठेवणे देखील शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की ते घरामध्ये लावल्याने घरात सुख-समृद्धीसह देवी लक्ष्मीचा स्थायी वास होतो.

यासोबतच व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत असते. अशा परिस्थितीत नवीन वर्षाच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर यापैकी कोणतीही वस्तू लावा.