Car Care Tips : प्रवासादरम्यान सोबत ठेवा ‘या’ वस्तू, नाहीतर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Car Care Tips : राज्यात सध्या कडाक्याची थंडी पडलेली आहे. अनेकजण या दिवसात लांबच्या प्रवासाला जाण्याचा प्लॅन करतात. परंतु, अनेकजण काही गोष्टींची काळजी घेत नाही त्यामुळे त्यांचा प्रवास सुखकर होत नाही.

कारण प्रवास करत असताना नेहमी कारमध्ये अत्यावश्यक गोष्टी सोबत ठेवाव्यात. ज्यामुळे प्रवास सुखकर होतो. जर तुम्हीही या गोष्टी सोबत ठेवत नसाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.

1. कागदपत्रे

जेव्हा तुम्ही बाहेर जात असाल तेव्हा त्या वाहनाची कागदपत्रे नेहमी सोबत ठेवा म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स, प्रदूषण प्रमाणपत्र, इन्शुरन्स तसेच आरसी. तसेच तुमचे ओळखपत्र आणि युजर मॅन्युअल सोबत ठेवा.

2. अग्निशामक यंत्र

अनेकदा चालू कारला आग लागते. तशा तुम्ही कित्येक घटना पहिल्या असतील. सर्वात जास्त इलेक्ट्रिक वाहनांमध्ये ही समस्या असते. मागील काही दिवसांपासून अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे कारमध्ये अग्निशामक यंत्र ठेवा.

3. प्रथमोपचार पेटी

कार चालवताना जर तुम्हाला किरकोळ दुखापत झाली असेल तर प्रथमोपचार पेटी तुमच्यासाठी फायद्याची असेल. तसेच तुम्ही त्यात आवश्यक ती औषधेही ठेवू शकता.

4. टायर इन्फ्लेटर

टायर इन्फ्लेटरने तुम्ही टायरमध्ये हवा भरू शकता. त्याचबरोबर तुमच्या कारचा टायर पंक्चर किंवा सपाट झाला असेल तर त्याच्या मदतीने तुम्ही मेकॅनिककडे कार घेऊन जाऊ शकता. सध्या मार्केटमध्ये चांगल्या दर्जाचे टायर इन्फ्लेटर उपलब्ध आहे.

5. टूलकिट

तुमच्या कारमध्ये नेहमी बेसिक टूलकिट म्हणजेच हातोडा, स्क्रू ड्रायव्हरचा संच आणि स्पॅनर. कारमधील टायर बदलताना किंवा तो खराब झाल्यावर टूलकिटचा उपयोग होईल.