तथ्यहीन आरोप करून एखाद्याला बदनाम करायचे… खडसे यांची फडणवीसांवर टीका

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-राज्यात हे जे काही चाललं आहे ते कोण आणि कशासाठी करतेय हे जनतेला चांगले माहीत आहे. त्यांच्या खटपटी, लटपटी सगळे जाणून आहेत.

विरोधी पक्षाचं काम आहे, सरकार अस्थिर करायचं. परंतु काहीही केलं तरी जमत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

आरोप करून एखाद्याला पूर्ण बदनाम करायचे, आरोपामध्ये तथ्य नसले तरी मीडिया आणि यंत्रणांची मदत घेऊन प्रकरण पेटत ठेवायचे, ही विरोधी पक्षाची कला असते.

सध्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस या कलेचा उपयोग करत असल्याचा टोला देखील खडसे यांनी लगावला आहे. एकनाथ खडसे बुधवारी नगरला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप. त्यावरून भाजपने घेतलेली भूमिका यावर त्यांनी मते मांडली. पैशाच्या मागणीसंबंधी झालेल्या आरोपांवर बोलताना ते म्हणाले, सिंग यांनी पदावर असताना आरोप करायला हवे होते.

पोलिसांत बदल्यांसाठी पैसे घेतले जातात, हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आरोप करून एखाद्याला पूर्ण बदनाम करायचे, विरोधी पक्षाकडे कला असतात.यासाठी प्रचंड बुद्धीमत्ता लागते. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सध्या तेच करीत आहेत.

मीही बराच काळ विरोधी पक्षात होतो, त्यामुळे या कला मलाही अवगत आहेत. फडणवीस मला ज्युनिअर आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची मागणी योग्य आहे का, यावर थेट उत्तर देणे मात्र खडसे यांनी टाळले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24