खाकी ऑन रोड…नियमांचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये हजारोंच्या संख्येने बाधितांची भर पडते आहे.

यामुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे. तसेच नागरिकांनी देखील कोरोनाच्या अनुषंगाने शासनाने घालून दिलेले नियमांचे पालन करावे असे आवाहन केले आहे.

याच पार्श्ववभूमीवर आज नेवासा तालुक्यात पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला.

शहरातील मुख्य भागामध्ये हा रूट मार्च काढण्यात आला. तालुक्यात करोना रुग्णांच्या संख्येत झपाटीने वाढ होतं आहे.

करोना काळात सूचनांचे नागरिकांनी पालन करावे तसेच पोलीसांना नागरीकांनी सहकार्य करावे अश्या सूचना या वेळी आधिकारी यांनी दिल्या.

यावेळी प्रांत आधिकारी गणेश पवार, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, पोलीस निरीक्षक विजय करे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर,

नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल व पोलीस कर्मचारी या रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24