वाढती गर्दी रोखण्यासाठी खाकी ऑन रोड… कारवाईसोबतच दिली समज

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने कडक नियमांची अमलबजावणी करण्यात आली आहे.

मात्र तरीही नागरिक बेफिकीर होऊन घराबाहेर फिरत असल्याचे चित्र सध्या नगर जिल्ह्यात दिसत आहे. यामुळे कारवाई शिवाय पर्याय नसल्याने पोलीस पथके देखील रस्त्यावर फिरू लागले आहे.

नुकतेच नेवासे तालुक्यातील माका परिसरात कोरोनाच्या वाढत्या कहरास न जुमानता सातत्याने गर्दी, मिनीबाजार,विनाकारण टोळी करून दिवसभर बसणारे,

मोकाट फिरणारे दुचाकीस्वार तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यावसायिकांना सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांचेकडुन आपल्या पथका समवेत कोरोनाच्या वाढत्या कहराबाबत समज देवुन काहींवरती कारवाई करण्यात आली.

दरम्यान माका परिसरातील गर्दी काही केल्या कमी होताना दिसत नाही. हे लक्षात येताच पोलिस प्रशासन गर्दी कमी करण्यासाठी थेट रस्त्यावर उतरली आहे.

कोरोना साथीबाबत आढावा घेत,कर्पे यांनी अत्यावश्यक सेवा दुकानधारकांनी कोरोना टेस्ट करूनच सकाळी11वाजेपर्यंतच आपली दुकाने चालवावीत तसेच इतर दुकाने बंद ठेवण्याबाबत सुचना केल्या आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24