अहमदनगर जिल्ह्यात खाकीला कलंक ! पोलीसाकडून लग्नाचे आमिष दाखवून …

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणीस लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी शरीर संबंध ठेवून गर्भवती ठेवले. गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडून गर्भपात करण्यास भाग पाडले. तसेच पत्नी व मुले असल्याची माहिती लपवून फसवणूक केली.

तसेच लग्नास नकार देवून जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केली. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कॉन्स्टेबल तुळशीराम उर्फ राजू पोपट वायकर यांच्याविरुद्ध अत्याचार व अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सन २०१६-१७ साली वायकर व युवतीची एका गुन्ह्याच्या तपासाच्या निमित्ताने ओळख झाली. या तरुणीस २०१९ पासून लग्नाचे अमिष दाखवून श्रीरामपूर येथे फ्लॅटवर तसेच बाभळेश्‍वर व शिर्डी येथे लॉजवर नेवून वेळोवेळी शरीर संबंध ठेवले. त्यातून ती तरुणी गर्भवती राहिली.

गर्भवती असल्याचे वायकर यास समजताच त्याने गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडून गर्भपात केला. त्याचे लग्न झालेले असून त्यास अपत्य असल्याची माहिती लपवून ठेवून फसवणूक केली. आरोपी तुळशीराम वायकर हा दि. १४ ऑॅगस्ट २०२१ रोजी रात्री तरुणी रहात असलेल्या श्रीरामपूर येथील फ्लॅटवर आला व बळजबरी शरिरसंबंध ठेवले.

दुसऱ्या दिवशी सकाळी ड्युटीवर जातो, असे सांगून गेला ते परत आलाच नाही. त्यामुळे पिडीत तरुणी दि. ३ सप्टेंबर २०२१ रोजी नेवासा तालुक्यातील भेंडा येथे आरोपीच्या घरी गेली.

त्यावेळी वायकर व त्याची आई सईबाई पोपट वायकर, पत्नी हिराबाई तुळशीराम वारकर यांनी तरुणीस जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादित म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office