चक्क इनोव्हातुन खिलारी गाय पळवून नेली!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-घरासमोर झाडाला बांधलेली खिलारी जातीची शिंगाची पांढरी गाय इनोव्हा या चारचाकीतून लांबविल्याचा धक्कादायक प्रकार कोपरगाव शहर परिसरात शुक्रवारी मध्यरात्री ३.३० वाजेच्या सुमारास घडला.

याबाबत सह्याद्री कॉलनीत राहत असलेले जनार्दन जगन्नाथ गायकवाड यांनी ९ एप्रिल रोजी रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास इनोव्हा कंपनीच्या चारचाकी गाडीत तीन ते चार जण गाय टाकत असल्याचे त्यांनी बघितले.

उमेश नानासाहेब नाईक (रा. नाईकनगर) यांच्याकडे १० वर्षापासून दोन गावरान गायी आहेत व एक वासरू आहे. सर्व गुरे ते घरासमोरील झाडाला बांधतात. गुरुवारी ८ एप्रिलला रात्री साडेअकरा वाजता घरातील सर्व जण झोपले,

तेव्हा दोन्ही गायी व वासरू दावनीला बांधलेले होते; मात्र शुक्रवारी ९ एप्रिलला सकाळी साडेसहा वाजता ते उठले तेंव्हा दोन गायीं पैकी खिलार शिंगे असलेली पांढरी गाय दिसून आली नाही. म्हणून त्यांनी तिचा शोध घेतला.

सह्याद्री कॉलनीतील गायकवाड यांनी त्यांना इनोव्हातून गाय नेल्याचे सांगितले. शोध घेत असता तेरा बंगले परिसरात राहणारे शेख साजिद जमशेद यांनी आपल्याही दोन गायी चोरी गेल्या असल्याचे सांगितले.

नाईक यांनी त्यांची खिलार शिंगे असलेली पांढरी गाय चोरीला गेल्याची तक्रार कोपरगाव पोलिसांत दिली आहे. या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या परिसरात अनेकदा गुरे चोरीच्या घडतात; मात्र पोलिसात तक्रार देऊनही गुरे पुन्हा परत मिळाली नाही.

त्यामुळे अनेकजण तक्रार देणेही टाळत असल्याचे येथील पशुपालकांनी सांगितले. तर या गुरे चोरणारी टोळी एकच असल्याची शक्यताही व्यक्त केली असून टोळीचा शोध लावावा, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24