सोळा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला पळविले,पालक वर्गात मोठी खळबळ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  श्रीरामपूर तालुक्यातील मुठे वडगाव परिसरात राहणार्‍या साडे सोळा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला श्रीरामपूर तालुक्यातीलच असलेल्या भामाठाण गावातील एका वीस वर्षाच्या तरुणाने पळवून नेल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्या मुलीस पळवून नेणारा आरोपी किरण बन्सी थोरात वय 20 वर्ष, राहणार- भामाठान, तालुका श्रीरामपूर याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी किरण याने अल्पवयीन मुलीला कशाचे तरी अमिष दाखवून पळवून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेमुळे पालक वर्गात मोठी खळबळ माजली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24