अहमदनगर मध्ये राठोडांच्या फोटोला मारले जोडे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-पुजा चव्हाण तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात वादग्रस्त ठरलेले मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात जनमानसात संतापाची लाट उसळली आहे.

याचेच पडसाद नगर शहरात देखील पडलेले पाहायला मिळाले. आज मंत्री राठोड यांच्या फोटोला दिल्लीगेट चौकात जोडे मारत नगर शहर महिला भाजपने रस्तारोको केला.

राज्यातील आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप आहेत.

नागरिकांची कामे करणे, त्यांना सोयीसुविधा पुरविणे ही कामे करण्यापेक्षा सरकारमधील मंत्र्यांमध्ये महिलांवर अत्याचार करण्याची चढाओढ सुरू असल्याचे वल्लाकट्टी म्हणाल्या.

नव्यानेच उघड झालेले मंत्री संजय राठोड यांचे प्रकरण भयानक आहे. मत्री राठोड यांचा राजीनामा घेवून या प्रकरणाची सत्यता समोर आणावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी महिला शहरजिल्हाध्यक्ष अंजली वल्लाकट्टी, प्रदेश सरचिटणीस सुरेखा विद्ये, प्रिया जानवे, कॅन्टोन्मेंट सदस्या साठे, नम्रता सगम, सविता सामल, अर्चना चौधरी, संध्या पावसे,

ललिता कोटा, अश्विनी करांडे यावेळी उपस्थित होत्या. पुजा चव्हाण तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे भक्कम पुरावे मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अद्याप त्यांचा राजीनामा न घेता या प्रकरणाकडे डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे राज्यात महिला असुरक्षित असल्याचा आरोप अंजली वल्लाकट्टी यांनी केला.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24