किरण काळे यांनी मानसोपचार सल्ला व उपचार घ्यावेत !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :-काँग्रेसच्या स्टंटमॅन किरण काळे यांनी पुन्हा एकदा नवीन स्टंट केला आहे व काळे मोठ्या लोकांवर आरोप करत असतात, त्यांच्या वरिष्ठांना खूश करण्यासाठी असे ते वारंवार प्रकार करतात असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अभिजित खोसे,सुरेश बनसोडे,निलेश बांगरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

काळे यांनी मानसोपचार सल्ला व उपचार घ्यावेत, असा सल्ला त्यांनी दिला. काल दिनांक २८ मे, २०२५ रोजी महानगरपालिकेच्या जुन्या मनपा कार्यालयातील आरोग्य अधिकान्याच्या दालनामध्ये आ. संग्राम जगताप लसीकरण नियोजन जाणून घेण्यासाठी गेले होते.

तेथे काळे यांचा स्टंट पाहिला. त्यांचा स्टेट हा नगरकरासाठी काही नवीन नाही. पण या माध्यमातून त्याच्या पक्षश्रेष्ठींना किरण काळे हे काय दाखवण्याचा त्याचा प्रयत्न करतात, हे समजून येत नाही.असे ते म्हणाले, काही जण ब्लॅकमेल करणारे तेथे होते,

ते महापालिका मधील फाईल पळवून नेतात,असा आरोप खोसे, बनसोडे व बांगरे यांनी कोणाचेही नाव न घेता या वेळी केला. सुवेंद्र गांधी यांनी एक व्हिडीओ काल टाकला ,त्यात काही तथ्य नाही,महापालिका मध्ये लस कोणाला कशी मिळतात हे माहीत आहे.

तेथे आवक- जावक नोंद असते. हे काय अर्बन बँक नाही,की बापाची सही पोरगा करतो व पैसे काढतो, असे पालिकेत नाही, असा सूचक टोला त्यांनी लगावला . नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांचा व आमदारांचा कोणताही वाद झाला नाही,

ते खोटे बोलत आहे,बोराटे यांच्या वर हल्ला झाला असे ते म्हणाले तर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पाहिजे. तेथे मनपा आरोग्य अधीकारी बोरगे होते, त्यामुळे बोराटेना साक्षीदारही मिळेल, असे ते म्हणाले.

काल स्वतः आमदार संग्राम जगताप हे दुपारी २ वाजता शहरातील लसीकरणा बाबत आरोग्य अधिकारी बोरगे यांच्याकडून माहिती घेत होते,

तसेच उपाययोजना करण्याबाबत व सर्व लसीकरण केद्रना लसींचे समान वाटप करण्याचे सूचित करत असताना किरण काळे आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये आरडाओरड करू लागले.

त्यावेळी पोलीस प्रशासनाच्या अधिका-यांनी त्यांना याबाबत मज्जाव करून त्यांना हाताला धरून दालनाबाहेर काढले व स्टंट करण्यापासून रोखले. पण किरण काळे यांनी पत्रकार परिषद घेवून नेहमीप्रमाणे पत्रकार व नगरकरांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24