किरण माने यांनी सिल्व्हरओक येथे घेतली शरद पवारांची भेट; तब्बल दीड तास पवारांसोबत चर्चा

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- स्टार प्रवाह वाहिनीवरील “मुलगी झाली हो” या मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेत अभिनेता किरण माने हे विलास पाटील ही भूमिका साकारत होते.

माने हे सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असतात. माने यांचा आरोप आहे की, राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून बाहेर काढण्यात आले आहे. यासंदर्भात आता किरण माने यांनी शनिवारी सिल्व्हर ओक येथे जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मुंबई वाय बी चव्हाण सेंटर येथे पवारांसोबत त्यांनी तब्बल दिड तास चर्चा केली आहे. शरद पवारांच्या भेटीबाबत माने पुढे म्हणाले की, सांस्कृतिक दहशतवादाविरोधात आवाज उठवायचा असेल तर एकच नेता आहे जो विवेकी आहे, विचारी आहे आणि सांस्कृतिक क्षेत्राची माहिती असलेला एकच नेता म्हणजे शरद पवार आहे असे अभिनेता किरण माने म्हणाले आहे.

तसेच शरद पवारांसमोर मी माझं बोलण मांडले आहे. तर शरद पवार हे सर्वकाही शांतपणे ऐकून घेतात. ते तुम्हाला खोचक प्रश्न विचारतात. मलाही त्यांनी दोन-तीन खोचक प्रश्न विचारले.

त्यावरुन ते तुम्ही किती पाण्यात आहात, हे जोखतात. मी त्यांच्यासमोर माझी बाजू मांडली आहे. मला त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा नाही. पण आता ते हे सर्व कशा पद्धतीने मांडतात, हे बघुयात असंही माने म्हणाले.

माझ्यापेक्षा प्रखर राजकीय भूमिका अनेक कलाकारांनी आजपर्यंत घेतल्या आहेत. मला मालिकेतून काढले म्हणून मी बिलकूल खचलेलो नाही, तर मी मजेत आहे.

मी पोटार्थी नट नसल्यामुळे एका मालिकेतून बाहेर काढल्यामुळे मी काही रस्त्यावर येणार नाही, असेही किरण माने यांनी ठणकावून सांगितले.