Sushama Andhare : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गट आणि भाजपला चांगलेच धारेवर धरले आहे. माध्यमांशी सवड साधताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांना खोचक टोला लगावला आहे.
सुषमा अंधारे यांना शिवसेना ठाकरे गटाच्या फायरब्रॅन्ड नेत्या म्ह्णून ओळखले जाऊ लागले आहे. त्या सतत भाजप आणि शिंदे गटावर टीकेची तोफ सोडत असतात.
सुषमा अंधारे भाजपवर टीका करताना म्हणाल्या, भाजपमध्येच धुसफूस सुरू आहे. किरीट सोमय्या कष्टाळू आहेत. वाशिमला गेले. पुण्यात मार खाल्ला. किती कष्ट. त्यांना मंत्रिपदच द्यायला हवं.
केशव उपाध्ये, माधव भंडारी आणि पंकजा मुंडे यांना काय दिलं? बाहेरची लेकरं येतात त्यांना आंगडंपांगडं. स्वत:ची लेकरं मात्र उपाशी. भाजपचं म्हणजे बाहेरची बनारसी आणि घरची उपाशी, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.
राज्यातील सरकार कोसळून मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचेही सुषमा अंधारे यांनी अनेक वेळा म्हंटले आहे. आजही त्यांनी याबाबत उल्लेख केला आहे. त्या म्हणाल्या, राज्यातील शिंदे सरकार अधिकाळ चालणार नाही. हे सरकार 2023ला पडणार आहे. त्यानंतर राज्यात निवडणुका लागतील.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना त्या म्हणाल्या, आमच्याकडून जे 40 आमदार गेले. त्यांचा बायोडेटा चेक करा. त्यांनी यापूर्वीही दोन ते तीन वेळा उड्या मारल्या आहेत. त्यांची तशी फितरतच आहे.
सगळ्या पक्षांमध्ये उताणे पडल्यावर ते आमच्या पक्षात आले. लढले आणि जिंकले. आता आमची बिल्ली आम्हालाच म्याव करतेय. तिकडे जाऊन नाचत आहेत. त्यांना आता नाचण्यासाठी लग्नातच बोलवा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, मी खोक्यांवर कधीच बोलत नाही. मला त्याचं काही घेणंदेणं नाही. गद्दारी केलेल्या माणसांनी फक्त पक्षप्रमुखांचा विश्वासघात केला नाही तर मतदारांचाही केला. तिकडे गेले आणि गब्बर झाले. जागा कशी घेतात? पैसे कुठून येतात? असा प्रश्नही त्यांनी केला आहे.
अमृता फडणवीस यांनाही सुषमा अंधारे यांनी टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील तर म्हणे आम्ही मनावर दगड ठेवला आणि संधी दिली. आमची वहिनीबाई फार बोलतात. देवेंद्रजी हुडी घालू जायचे. मला पण माहिती नसायचं कुठे जातात, असं अमृता वहिनी सांगायच्या, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.