file photo

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- भाजपनेते किरिट सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यासंबधी आज ते कोल्हापूर दौऱ्यावर निघाले होते.

परंतु कोल्हापूरच्या हद्दीत पोहचण्याआधीच सोमय्या यांना पोलिसांनी कराड येथे रोखले आहे. सोमय्या याप्रकरणी सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

सोमय्या सोमवारी पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्याला भेट देणार होते.त्यानंतर सोमय्यांनी कोल्हापूर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाबाबत माहिती दिली होती.

सोमय्यांच्या जीवाला धोका आणि त्यांची भेट पाहता कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यामुळे भारतीय दंड संहितेच्या कलम 144 अंतर्गत त्यांना जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आल्याचे म्हटले होते.

मुश्रीफ समर्थक आक्रमक भाजपनेते किरिट सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप केले आहेत. त्याचे कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले आहेत.

18 आणि 19 सप्टेंबर कागल आणि कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत किरिट सोमय्या यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. सोमय्या कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये, ते कोल्हापूर जिल्ह्यात येऊ आल्यानंतर त्याचे गंभीर दुष्परिणाम भोगावे लागतील.

सोमय्या कोल्हापूर वासियांना आव्हान देत आहेत. त्यांना कोल्हापूरी भाषेत उत्तर दिले जाईल. खिंडित गाठून गनिमी काव्याने उत्तर दिले जाईल. अशी मते व्यक्त केली आहेत.