file photo

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करावी अशी मागणी कारखाना बचाव समितीने सक्तवसुली संचालनालयाकडे केली आहे.

पारनेर कारखाना बचाव समितीच्या प्रतिनिधींनी नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड व ईडीचे मुख्य संचालक संजय मिश्रा यांची दिल्ली येथे भेट घेऊन ही मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सोमय्या गुरूवारी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

यात ते पारनेर, कर्जत व जामखेड येथे भेटी देणार आहेत. “मी पारनेर साखर कारखाना बचाव समितीच्या सोबत पारनेर साखर कारखान्यास भेट देणार आहे. ३२ कोटी रुपयांमध्ये कशा पद्धतीने कारखाना पवार परिवाराच्या प्रभावाखाली दिला गेला. पवार परिवाराचे घनिष्ठ उद्योगपती मित्र यांनी त्यामध्ये २३ कोटी रुपये कसे टाकले?

या सगळ्यांचे पुरावे माझ्या हातात आलेले आहेत. ईडीसोबत माझी चर्चा सुरू आहे. परवा मी पारनेर साखर कारखान्याची पाहणी केल्यानंतर ईडी सोबत चर्चा करणार आहे. पारनेर साखर कारखान्याची आयकर विभाग, सहकार मंत्रालय आणि ईडी कडून चौकशी सुरू आहे.

जरंडेश्वर नंतर पवार परिवाराशी संबंधित पारनेर साखर कारखान्याचा घोटाळ्याबाबत येत्या काही आठवड्यात कारवाई सुरू होणार.” अशी माहिती भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज पुण्यात पत्रकारपरिषदेत बोलताना दिली. याचबरोबर, “पवार परिवाराचे घनिष्ठ मित्र, उद्योजक त्यांनी यामध्ये २३ कोटी रुपये हा साखर कारखाना घेण्यासाठी दिले होते.

३२ कोटीत लिलाव झाला. अतुल चोरडियांनी हे पैसे दिले. यात कोणकोण आहेत? कारण, जरंडेश्वरमध्ये असंच झालं. ६५ कोटीत कारखाना दिला गेला आणि ते ६५ कोटी कोणी भरले?, ओंकार बिल्डर्स. त्या बिल्डर्सचा आणि साखर कारखान्याचा संबंध काय?

पवार परिवार काय म्हणतं आमच्याशी संबंध म्हणजे जगाशी संबंध. तर ओंकार बिल्डर आज सहा महिन्यांपासून तुरुंगात आहे. त्याच्याकडून अजित पवारांच्या पत्नीच्या नावाने लोन लिस्ट देण्यात आलं. अशाच प्रकारचं कटकारस्थान पारनेर कारखान्यात दिसत आहे.” असं किरीट सोमय्या यांनी बोलून दाखवलं.