Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Kisan Credit Card : संधी सोडू नका! शेतकऱ्यांना सरकार देत आहे लाखो रुपयांचे कर्ज, त्वरित करा अर्ज

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वेगवेगळ्या योजना सुरु करत असते. यापैकी एक योजना म्हणजे 'किसान क्रेडिट कार्ड' योजना होय.

Kisan Credit Card : केंद्र तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी अनेक योजना राबवत असते. त्यापैकी एका योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना होय. देशभरात अनेकजण शेती करत आहेत. या शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पैशांची गरज पडते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यामुळे ते किसान क्रेडिट कार्डद्वारे कमी व्याजदराने बँकांकडून सहजपणे कर्ज मिळवू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे अल्प मुदतीचे हे कर्ज असून जे सध्या कोणत्याही सरकारी बँक तसेच प्रादेशिक ग्रामीण बँकेतून तुम्हाला दिले जाईल. त्यामुळे अशी सुवर्णसंधी सोडू नका.

कोणत्याही बँकेत बनवता येत आहे किसान क्रेडिट कार्ड

आता शेतीशी निगडित कोणत्याही शेतकऱ्यांना कर्जासाठी कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या जवळच्या शाखेत संपर्क साधता येतो. किसान क्रेडिट कार्ड तयार झाल्यानंतर, बँक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीच्या किंवा गरजेनुसार कर्ज देत असते. हे लक्षात घ्या की या कर्जाची कमाल मर्यादा रु.3 लाख इतकी आहे. सध्या अनेक बँका गावोगावी जाऊन शिबिरे लावून कर्ज देत आहेत.

तसेच यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन किसान क्रेडिट कार्ड योजना फॉर्म डाउनलोड करण्याच्या पर्यायातून फॉर्म डाउनलोड करा. त्यानंतर अर्ज योग्यरित्या भरून कागदपत्रे संलग्न करा आणि जवळच्या बँक शाखेत किंवा ग्राहक सेवा केंद्रात तो जमा करा. तुमचे किसान क्रेडिट कार्ड काही दिवसात बनवले जाईल. त्यानंतर तुम्ही तुमचे पैसे बँकेतून काढू शकता.