Tata Nexon Facelift : दिग्ग्ज कार उत्पादक कंपनी टाटा ही अनेक वर्षांपासून मार्केटमध्ये आणि ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी सतत नवनवीन कार्स लाँच करत असते. दरम्यान या कंपनीने आपल्या कारच्या किमतीत कमालीची वाढ केली आहे.
अशातच कंपनी आता पुन्हा एकदा आपली कार लाँच करणार आहे. टाटाच्या एका SUV चे फेसलिफ्ट व्हर्जन मार्केटमध्ये येणार आहे. आपल्या इतर कार्सप्रमाणे कंपनी यादेखील कारमध्ये शानदार फीचर्स देऊ शकते. या कारची किंमत किती असेल? जाणून घेऊयात.
बाजारात नवीन फेसलिफ्ट आवृत्ती येणार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये येणारी नेक्सॉनची फेसलिफ्ट आवृत्ती टाटा घेऊन येऊ शकते. लॉन्च करण्यापूर्वी कंपनीकडून याची चाचणी केली जात असून आता ही चाचणीदरम्यान ती भारतीय रस्त्यांवर दिसली आहे.
कसा असणार लूक
रिपोर्ट्सनुसार, टेस्टिंग दरम्यान स्पॉट झालेली टाटाची Nexon आहे. कंपनी यात कनेक्टेड टेललाइट देण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, नवीन मॉडेलमध्ये, Y आकाराऐवजी, X आकाराच्या डिझाइनचे घटक दिवे मध्ये दिसू शकतात. तसेच या नवीन कारमध्ये फारसा बदल होण्याची शक्यता खूप कमी आहे.
आतील भागातही असे होणार बदल
एसयूव्हीच्या इंटिरिअरलाही किरकोळ अपडेट्स मिळणार असून रिपोर्ट्सनुसार, नवीन Nexon ला कंपनीकडून एक मोठी आणि अपडेटेड इन्फोटेनमेंट सिस्टम मिळू शकते. यामध्ये 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात येईल. तसेच सात इंची डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अपहोल्स्ट्री अपडेट, सहा एअरबॅग्ज यांसारखे फिचर्स देण्यात येतील.
कसे असणार इंजिन
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीच्या नवीन कारमध्ये 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळेल. यामुळे एसयूव्हीला 225 न्यूटन मीटर टॉर्कसह 125 पीएस पॉवर मिळणार आहे. या इंजिनसोबत ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनही दिले जाऊ शकते. सध्याची SUV कंपनीकडून 1.2-लिटर पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित असून जी 120 PS आणि 170 Nm टॉर्क निर्माण करते. पर्याय म्हणून 1.5-लिटर डिझेल इंजिन उपलब्ध असं जे SUV 115 PS आणि 260 Nm टॉर्क देते.
सेफ्टी फीचर्स
या नवीन SUV च्या सुरक्षेबद्दल बोलायचे झाल्यास यात सहा एअरबॅग, ABS, EBD, HAC तसेच ADAS सारखी सेफ्टी फीचर्स देण्यात येतील. जर कंपनी त्यात ADAS सारखे सेफ्टी फीचर्स देणार असेल, तर सब-फोर मीटर SUV मध्ये हे फीचर असणारी ही पहिली SUV असणार आहे. यामुळे कारची किंमत वाढणार असली तरी अशा परिस्थितीत ती सर्व प्रकारांमध्ये सादर करण्यात येणार नाही हे लक्षात ठेवा.
किती असणार किंमत
सध्या कंपनीने नवीन Nexon च्या किमतीबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. परंतु, तिची किंमत सुमारे आठ लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. तर या वर्षाच्या अखेरीस किंवा 2024 च्या सुरुवातीला ही कार लॉन्च केली जाऊ शकते.