जाणून घ्या राज्यातील आजची कोरोनाची परिस्थिती

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-राज्यात गेल्या 24 तासांत 31 हजार 643 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 20 हजार 854 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 102 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

दरम्यान, कालपेक्षा आज कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं दिसत आहे. मात्र रविवार असल्यामुळे कोरोना चाचण्याही कमी झाल्यामुळे रुग्णसंख्येत घट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आजच्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 कोटी 74 लाख 5 हजार 518 झाली आहे.

त्यातील 2 कोटी 35 लाख 3 हजार 307 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यात सध्या 3 लाख 36 हजार 584 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर एकूण 54 हजार 283 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ध्या महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये अंशतः लाॅकडाऊन करण्यात आलेला आहे. तसेच, काही ठिकाणी रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. परंतु, तरीही कोरोना आटोक्यात येत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24