ताज्या बातम्या

Kolhapur Election : आमचे नाना लढले तर तुमच्या तोंडाला एवढा फेस आला मी लढलो तर काय हाल होतील..,चंद्रकांत पाटील

Published by
Ahmednagarlive24 Office

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदार (Kolhapur Election) संघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayashri Jadhav) यांनी भाजपच्या सत्यजित कदम (Santyajit Kadam) यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. त्यामुळे काँग्रेस (Congress) नेत्यांकडून जल्लोष व्यक्त होत आहे.

मात्र निवडणूक प्रचारादरम्यान भाजप (Bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले होते की, पराभूत झालो तर मी राजकारण सोडेन, हिमालयात जाईन.

पाटील यांनी केलेल्या या दाव्यामुळे पुढे काय होईल याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असून यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले, मी हरलो तर हिमालयात जाईन, असे म्हणालो मी.. आज मी नाही तर सत्यजित कदम हरलेत. त्यामुळे मी काय करायचं याचा प्रश्नच येत नाही, असे उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

दरम्यान, भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा आजच्या निवडणुकीत पराभव झाला. आता निवडणूक प्रचारात दावा केल्याप्रमाणे तुम्ही हिमालयात जाणार का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांना करण्यात आला आहे.

त्यावेळी ते म्हणाले, माझा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तर राजकारण सोडेन हिमालयात जाईन, असा दावा केला होता. आमचा नाना (सत्यजित कदम) लढले तर तुमच्या तोंडाला एवढा फेस आला मी लढलो तर काय हाल होतील, याचा विचार करा, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

त्याचबरोबर निवडणूक हरल्यानंतर हिमालयात जाण्याचं वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना डिवचण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसने आज निकालानंतर एक ट्वीट केले आहे.

हिमालयात जाईन म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना स्वेटर, मफलर, कानटोपी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे देण्यात येईल, फक्त ते कधी निघणार आहेत, हे सांगावे, असा मजकूर त्यात लिहिला आहे.

Ahmednagarlive24 Office