अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- कोविडच्या भयावह संकटातही अवैध धंदे सुरूच असल्याचे स्पष्ट होत आहे. बुधवारी (ता.५) दुपारी १ वाजेच्या सुमारास
कोपरगाव शहर पोलिसांनी उपनगरामध्ये कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनास पकडले. या कारवाईत सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास संजय नगर भागातील हाजी मंगल कार्यालय परिसरातून अवैधरित्या कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार कोरोना गस्तीवर असणाऱ्या पथकाने वाहतूक करणारे टाटा एस वाहन (क्र. एमएच.२०, सीटी.६८८३) पकडले असता ४ गायी व ५ लहान वासरे असे एकूण ९ जनावरे मिळून आले.
या प्रकरणी शहर पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवराज भाऊसाहेब आजगे (वय २२, रा.शिंगणापूर) व अरबाज माजिद कुरेशी (वय १९, रा.संजय नगर) यांच्याविरुध्द गु.रं.नं.१३२/२०२१ भारतीय प्राण्यास निर्दयीपणे
वागवण्याच्या अधिनियम १६६० चे कलम ११(१)(ह) व महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व सुधारणा अधिनियम क्र.१९९५ चे कलम ५ (ब) ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत अंदाजे २ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये ४ मोठ्या गायी व ५ वासरांचा समावेश आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.तिकोणे हे करत आहे.